डॉ. अमोल कोल्हे यांनी 'या' संदर्भात केली मोठी घोषणा केली; वाचा सविस्तर

या पोस्टनंतर राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं होतं. ते काय घोषणा करणार याबद्दल अनेक तर्क वितर्क मांडले जात होते.

Amol Kolhe (Photo Credit: Instagram)

Dr. Amol Kolhe Announcement: मराठी अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या त्यांच्या अभ्यासामुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच ते राजकारणातही सक्रिय असल्याने अनेक राजकीय मुद्द्यांवर देखील ते बेधडकपणे भाष्य करतात. अमोल कोल्हे यांनी 14 डिसेंबर रोजी अशीच एक खळबळजनक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. ज्यामध्ये ते लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे लिहिले होते.

अमोल कोल्हे यांनी “येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार” अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं होतं. ते काय घोषणा करणार याबद्दल अनेक तर्क वितर्क मांडले जात होते. कोणी 'बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला' असा अंदाज बांधत होतं तर कोणी 'शेतकरी कर्जमाफी होईल' असा देखील विचार करत होतं. परंतु, अमोल कोल्हे यांनी आपल्या निर्मिती संस्थेसंदर्भात ही घोषणा केली आहे.

जगदंब क्रिएशन्स ही अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था आहे. आजपर्यंत काही नाटकं आणि 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Zee Marathi) व ‘स्वराज्यजननी जिजामाता’ (Sony Marathi) या दोन मालिकांची निर्मिती ही संस्था करत आहे. परंतु, अमोल यांनी घोषणा केली की, वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करा, अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधीच अमोल यांनी शिवसेना पक्षातून राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते खासदार म्हणून निवडून देखील आले. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांनी हातमिळवणी केली.