Coronavirus विरुद्धच्या लढ्यात मराठी कलाकारांचा मदतीचा हात; सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह इतर कलाकारांचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान

कोरोना व्हायरसच्या लढ्यात मदत म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, क्षिती जोग यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ठराविक रक्कम जमा करुन आपले योगदान दिले आहे.

Sai Tamhankar and Sonalee Kulkarni (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महाभयंकर संकटात समाजातील विविध स्तरातून अनेक प्रकारची मदत केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत शक्य तितके योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. यात आता मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सई ताम्हणकर (Sai Tamhankar) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (CM relief fund) ठराविक रक्कम जमा करुन आपले योगदान दिले आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. सोनालीने पोस्टमध्ये लिहिले की, "हातावर पोट असणाऱ्यांसाठी काहीतरी करावंस वाटतंय म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. मात्र त्यावर चर्चा नको म्हणून रक्कम सांगत नाही." ही रक्कम गरजूंपर्यंत पोहचावी अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे.

सोनाली कुलकर्णी पोस्ट:

 

 

View this post on Instagram

 

मी देवाचे आणि माझ्या आई -बाबाचे आभार मानते की ह्या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. चार पैसे, माणसं आहेत. ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतंय म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. ती किती आहे यावर चर्चा होवू नये म्हणून सांगत नाही. कमी- जास्त, जे काही असेल, या लढ्यात माझा खारीचा वाटा आहे. गरजूंपर्यंत ही पोहचावी आणि त्याचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा 🙏🏻 #cmrf #maharashtra #coronarelief #fund #indiafightscorona P.S. If you want to contribute and looking for the right medium then checkout the link in bio. #cheifministerofmaharashtra #relieffund website!

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

अमृता खानविलकर:

अमृता खानविलकर हिने देखील कोरोनाच्या लढ्यात मदत म्हणून आपले योगदान दिले आहे. तसंच तुम्हीही या कठीण प्रसंगात गरजूंना मदत करा असे आवाहनही तिने केले आहे.

 

View this post on Instagram

 

Together we have and will always overcome the most crucial circumstances ... I m doing my bit ... please do yours .... please help and contribute to this account to help the needful @cmomaharashtra_ @uddhavthackeray 🙏🏻 #stayhomesavelives #covid_19 #helptheneedful

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

अभिनेत्री सई कुलकर्णी हिने देखील 1.5 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. यापूर्वी सर्व मराठी कलाकारांनी एकत्रित येऊन कोरोना व्हायरसच्या संदर्भात जागृती करणारा एक खास व्हिडिओ शेअर केला होता. त्याद्वारे प्रेक्षकांना घरी सुरक्षित राहण्याचे आणि स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now