कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी CINTAA उतरली मैदानात; कामगार आयुक्तांच्यासमोर मांडल्या समस्या
यावेळी CINTAA कडून सहसचिव संजय भाटिया, सीईओ सतीश वासन आणि कार्यकारी समिती सदस्य हेतल परमार उपस्थित होते
सध्या महाराष्ट्रामध्ये किरण माने प्रकरण चर्चेत आहे. एक ठराविक राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला स्टार प्रवाह हा वाहिनीने मालिकेमधून काढून टाकले, असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला होता. त्यानंतर त्याबाबत बराच गदारोळ माजला. एका कलाकाराची अशी गळचेपी केल्याने स्टार प्रवाह वाहिनीवर बरीच टीकाही झाली होती. आता भारतातील कोविड-19 च्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, कलाकारांसंबंधी नियमांमधील बदलांबाबत गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आणि कलाकारांसमोरील अनेक आव्हानांवर तोडगा काढण्याचे हेतूने सिने आणि टीव्ही कलाकार संघटना (CINTAA) मैदानात उतरली आहे.
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी नुकतीच कामगार भवन, बीकेसी येथे अतिरिक्त कामगार आयुक्त शिरीन एस लोखंडे आणि सचिव विनिता वेद सिंघल यांची मुंबईत भेट घेतली. प्रतिनिधींनी भारतातील कोविड-19 च्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शूटिंग नियमांमधील बदलांबाबतच्या चिंतेवर चर्चा केली.
माननीय कामगार आयुक्तांनी पुढील समस्यांची दाखल घेतली-
- जे अभिनेते एका महिन्यात सात दिवसांपेक्षा कमी काम करतात त्यांना कराराखाली आणले जाईल आणि 30 दिवसांच्या आत पैसे दिले जातील.
- मुलांनी दिवसातून 8 तासांपेक्षा जास्त काम करू नये आणि त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे असावीत.
- अभिनेत्यांना लवकरात लवकर कंत्राटी कागदपत्रे देण्यात यावीत.
- शुटिंग शिफ्टच्या विचित्र तासांच्या बाबतीत जसे की खूप लवकर कॉल टाइम्स आणि रात्री उशिरा पॅक अप असेल तर, महिला आणि बाल कलाकारांना त्यांच्या घरातून पिक-अप आणि ड्रॉप प्रदान करावा.
- एकसमान करारासाठी विनंती आणि ब्रॉडकास्टरचा पक्ष करार म्हणून समावेश करावा.
- पेमेंटमध्ये होणारा विलंब टाळला जावा.
- कलाकारांना प्रथम निर्मात्यांनी कराराची अनैच्छिक प्रत दिली पाहिजे. दोन्हीकडे कराराची सारखीच प्रत असायला हवी यावर भर दिला पाहिजे.
अशाप्रकारे अभिनेत्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी कामगार आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले. यावेळी CINTAA कडून सहसचिव संजय भाटिया, सीईओ सतीश वासन आणि कार्यकारी समिती सदस्य हेतल परमार उपस्थित होते.