Ashleel Udyog Mitra Mandal Trailer: सई ताम्हणकर बनली सविता भाभी; अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमाची पहिली झलक पाहिलीत का? (Watch Video)

अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच याही प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. सविता भाभी ही भूमिका दुसरं तिसरं कोणी नव्हे तर मराठीतील बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) साकारणार आहे.

Ashleel Udyog Mitra Mandal (Photo Credits: Youtube)

काही दिवसांपूर्वी पुण्यात सविता भाभी… तू इथंच थांब!! असे होर्डिंग दिसून आलं होतं, त्यानंतर काहीच तासात हे मराठीतील एका सिनेमाचे पोस्टर असल्याचा सुद्धा उलगडा झाला होता. सविता भाभी (Savita Bhabhi) हे आगामी मराठी सिनेमा अश्लील उद्योग मित्र मंडळ (Ashleel Udyog Mitra Mandal)  मधील पात्र असणार आहे. नावावरूनच बोल्ड वाटणाऱ्या या सिनेमात सविता भाभी म्हणजे नक्की कोण साकारणार या प्रश्नाने सर्वांची उत्सुकता ताणून धरली होती. काही वेळापूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच याही प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. सविता भाभी ही भूमिका दुसरं तिसरं कोणी नव्हे तर मराठीतील बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) साकारणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला मादक आवाजात सईची पहिली झलक तर शेवटी, किंचित झलक दाखवल्याने या भूमिकेत सई नेमकी कशी दिसेल याबाबत ट्रेलर मधून तरी अंदाज बांधता येत नाही.

ट्रेलर मध्ये पाहायला मिळत असल्याप्रमाणे, एक मुलाच्या सेक्सशुअल फॅंटसीज पूर्ण होत नसताना तो सविता भाभी या पात्राकडे कसं पाहतो, आणि त्यातूनच तिला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ आणि ती खरोखरच भेटल्यावर त्याची प्रतिक्रिया हे सगळं या सिनेमात पाहायला मिळेल असा अंदाज आहे. 'सविता भाभी... तू इथंच थांब', पुणे येथील होर्डिंग्जमागे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’

अश्लील उद्योग मित्र मंडळ ट्रेलर

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नावावरूनच बरेच तर्कवितर्क लढवले गेले आहेत. मात्र चित्रपटाची कथा नेमकी काय आहे याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. सई सोबतच यामध्ये पर्ण पेठे, अभय महाजन , अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. आलोक राजवाडे याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या महिन्यात म्हणजेच 6 मार्च ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement