Makar Sankranti 2021 निमित्त अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांसह 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी शेअर केले ब्लॅक साडी लूक!
काळ्या रंगातच्या साडीत यांचे सौंदर्य अधिकच खुलेले आहे.
आज मकर संक्रांतीचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. सणाच्या नावात वैविध्य असलं तरी हा सण सर्वत्र अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. सणानिमित्त परंपरेने चालत आलेल्या विधी, पूजा केल्या जातातच. पण त्याचबरोबर नटण्याची हौसही पुरवून घेता येता. एरव्ही अशुभ समजल्या जाणाऱ्या काळ्या रंगाला संक्रांती दिवशी विशेष महत्त्व असते. काळ्या रंगाचे ड्रेस, साड्या परिधान करुन संक्रांतीच्या सणाचा आनंद घेतला जातो. मराठमोळ्या अभिनेत्रींनी देखील संक्रांती निमित्त खास ब्लॅक साडी लूक शेअर केले आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe), प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere), भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye), वीणा जगताप (Veena Jagtap) या अभिनेत्रींचे सौंदर्य काळ्या रंगाच्या अधिकच खुलेले आहे. (मकर संक्रांती ला पारंपारिक अंदाजात नटण्यासाठी काळ्या रंगातील साड्या, ड्रेससाठी खण, इरकल ते पैठणी पर्याय!)
अमृता खानविलकर:
ऋतुजा बागवे:
सोनाली कुलकर्णी:
प्रार्थना बेहेरे:
वीणा जगताप:
भाग्यश्री लिमये:
या सर्वच अभिनेत्रींचे ब्लॅक साडी लूक्स अत्यंत मनमोहक आहेत. हे सुंदर फोटोज शेअर करत त्यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापैकी तुम्हाला आवडलेल्या लूकमधून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचा नवा लूक तयार करु शकता किंवा दोन-तीन लूक्सच्या कॉबिनेशनमधून अनोखा लूक साधू शकता.