Amruta Khanvilkar Bold Photos: मराठमोळी अमृता खानविलकरच्या 'हे' ग्लॅमरस फोटोज पाहून बॉलिवूड अभिनेत्रींचा पडेल विसर
Amruta Khanvilkar Bold Look (Photo Credits: Instagram)

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिची सोशल मिडियावर प्रचंड हवा आहे. तिचा मराठमोळा लूक हा सोशल मिडियावर जितका चर्चेत असतो तसेच तिचा बोल्ड लूक (Bold Look) देखील चर्चेत असतो. नुकतेच अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून अनेकांना बॉलिवूड अभिनेत्रींचा देखील विसर पडेल. यात तिची हेअरस्टाईल आणि बोल्ड लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोजला 43 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

शर्टाची वरची बटन्स काढून तसेच काळ्या रंगाच्या वनपीस मधील तिचा बोल्ड लूक चाहत्यांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

हेदेखील वाचा- Sai Tamhankar Red Hot Look: मराठमोळ्या सई ताम्हणकर चा लाल रंगाच्या ड्रेसमधील हा रेड हॉट लूक वर अमृता खानविलकरने दिली 'ही' भन्नाट प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

गोलमाल (Golmaal) या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर 'मुंबई साल्सा' (Mumbai Salsa) या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

साडे माडे तीन, गैर, नटरंग, धुसर, अर्जुन, झकास, बाजी, कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटांसह हिंम्मतवाला, राजी, सत्यमेव जयते, फूंक, फूंक 2, मलंग या बॉलिवूड चित्रपटात देखील तिने चाहत्यांच्या आपल्या अभिनयाची झलक दाखवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

हिंदी आणि मराठी चित्रपटांसोबत तिने झलक दिख ला जा, खतरों के खिलाडी रिअॅलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागही घेतला होता.

त्याचप्रमाणे 2 MAD, डान्स इंडिया डान्स (Season 6), सुपर डान्सर महाराष्ट्राचा या कार्यक्रमात परीक्षक राहिली आहे.