अजय गोगावले यांच्या आवाजातलं एक काळजाला भिडणारं गाणं म्हणजे ‘सुंदरा’; पहा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपतील या गाण्याची खास झलक

झिंगाट ते सैराट झालं जी अशा अनेक हिट गाण्यांना आपल्या आवाजाने स्वरबद्ध करणारे अजय गोगावले यांनी हे नवं गाणं गायलं आहे.

KCD movie (Photo Credits: Facebook)

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून स्त्री आणि बायको यात अडकलेल्या आईच्या आयुष्यात येणा-या अनेक घडामोडींची झलक दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नव्या कोऱ्या चित्रपटातून सई एका पूर्णपणे नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

ट्रेलरनंतर नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. झिंगाट ते सैराट झालं जी अशा अनेक हिट गाण्यांना आपल्या आवाजाने स्वरबद्ध करणारे अजय गोगावले यांनी हे नवं गाणं गायलं आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या आवाजातील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हे गाणं प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. गाण्याच्या आवाजानंतर थेट काळजाला भिडतात ते गाण्याचे शब्द आणि या गाण्याचे बोल गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. तसेच संगीत दिग्दर्शनही गजेंद्र अहिरे आणि त्यांच्या सोबतीला चैतन्य अडकर यांनी केले आहे.

पहा गाण्याची ही खास झलक,

छत्रपती शिवराय आणि भगवा झेंडा यांचे नातं सांगणारे फत्तेशिकस्त चित्रपटातील 'रणी फडकती' गाणे प्रदर्शित, अंगावर काटा आणणारे हे गाणे एकदा पाहाच

सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली असून सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे.

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा नवा चित्रपट 22 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif