Sai Tamhankar Red Hot Look: मराठमोळ्या सई ताम्हणकर चा लाल रंगाच्या ड्रेसमधील हा रेड हॉट लूक वर अमृता खानविलकरने दिली 'ही' भन्नाट प्रतिक्रिया
किती हा हॉटपणा. आधीच गरमी वाढलीय.' अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
मराठीमध्ये आपल्या अभिनयाने तसेच बोल्डनेस अनेकांना भुरळ घातलेली अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. तिच्या अभिनयाची जितकी चर्चा होते तितकीच्या तिच्या हॉट आणि बोल्डनेसची (Boldness) देखील. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शूट केले आहे. त्यात ती खूपच हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) दिसत आहे. या फोटो शूटमध्ये तिने लाल रंगाचा मोठा ड्रेस परिधान केला आहे. त्यात तिचा मेकअप, लाल लिपस्टिक या सर्वांमुळे तिच्या बोल्डनेसला काही पारावार उरला नाही. तिचा हो फोटोला चाहत्यांनी जबरदस्त लाईक्स दिले असून तिचे मैत्री अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
सईचा हा रेड हॉट लूक मधील फोटो पाहून अमृताने तिच्या या फोटोला 'थांबव हे सगळे. किती हा हॉटपणा. आधीच गरमी वाढलीय.' अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. झी मराठी वरील 'माझा होशील ना' मालिकेतून घराघरातील पोहोचलेली सई ऊर्फ गौतमी देशपांडे हिचा 'हा' ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला का?
सईच्या या फोटोला आतापर्यंत 61 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सई ताम्हणकरचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. सई सोशल मिडियावरही प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोमधून ती आपल्या चाहत्यांसोबत जोडलेली राहते आणि त्यांचे मनोरंजन करते.
सई ताम्हणकर गजनी, हंटर हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. यात हंटर मध्ये तिचे बोल्ड सीन आणि हॉट लूक बराच चर्चेत आला होता. तर मराठी चित्रपटात प्रथमच बिकिनी घालून स्क्रीनवर आलेली ती पहिली अभिनेत्री आहे.