Aapdi Thapdi Teaser: Shreyas Talpade ने बर्थ डे दिवशी चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; आगामी मराठी प्रोजेक्टची पहा खास झलक!
श्रेयसच्या 'आपडी थापडी' मध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे, नवीन प्रभाकर, नंदू माधव, संदीप पाठक, खुशी हजारे असे कलाकार दिसणार आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या मराठी मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' मधून छोट्या पडद्यावरून रसिकांच्या घरात आला आहे. पण लवकरच रूपेरी पडद्यावरून तो पुन्हा रसिकांना भेटणार आहे. आज श्रेयसने त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधत खास टीझर शेअर केला आहे. 'आपडी थापडी' हा त्याचा आगामी मराठी सिनेमा असणार आहे. त्यामध्ये तो एका बापाची भूमिका साकरणार असल्याचं प्रोमो मधून समोर येत आहे. आजपासून 'आपडी थापडी' च्या शूटिंगला सुरूवात होत आहे.
दरम्यान श्रेयसच्या 'आपडी थापडी' मध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे, नवीन प्रभाकर, नंदू माधव, संदीप पाठक, खुशी हजारे असे कलाकार दिसणार आहेत. इंस्टाग्रामवर आज श्रेयसने या सिनेमाचा टीझर शेअर करताना 'आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट.
माझ्याबरोबरच आपले प्रेम आणि आशिर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो…हीच बाप्पा चरणी प्रार्थना.' असं कॅप्शन दिलं आहे. हे देखील नक्की वाचा: श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जूनचा आवाज, अभिनेत्याने शेअर केला 'Pushpa The Rise' चा हिंदीतील ट्रेलर.
आपडी थापडी टीझर
सध्या 10-12 वर्षांनंतर श्रेयस मराठी मालिकांमध्ये झळकत आहे. यापूर्वी 'आभाळमाया', 'अवंतिका' मध्ये त्याने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. हळूहळू तो बॉलिवूडकडे वळला आणि तिथेही त्याने 'इक्बाल', 'गोलमाल' सारख्या सिनेमांमधून आपला ठसा उमटवला. 2015 साली प्रदर्शित झालेला बाजी हा त्याचा शेवटचा मराठी सिनेमा होता. त्यानंतर आता पुन्हा 5-6 वर्षांनी श्रेयस मराठीत नवा सिनेमा घेऊन येत आहे.