Lok Sabha Elections 2019: उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसकडून तिकीट जाहीर; उत्तर मुंबई मतदारसंघातून लढवणार निवडणूक

पक्षप्रवेश झाल्यावर आता उर्मिला मातोंडकर हिला उत्तर मुंबईतून निवडणूकीचे तिकीट जाहीर झाले आहे.

Urmila Matondkar with Congress President Rahul Gandhi (Photo Credits: IANS)

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर (Umrila Matondkar) हिने काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाल्यावर आता उर्मिलाला उत्तर मुंबई मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूकीचे तिकीट जाहीर झाले आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतील भाजपचे गोपाळ शेट्टी या तगड्या उमेदवाराविरुद्ध उर्मिला मातोंडकर निवडणूकीला उभी राहणार आहे.

ANI ट्विट:

 

उर्मिलाच्या रुपात उत्तर मुंबईला एक मराठमोळा आणि ग्लॅमरस उमेदवार लाभला आहे. काँग्रेसमधील प्रवेशानंतर उर्मिलाने भाजपवर टिकास्त्र सोडले. धर्म आणि देशभक्ती शिकवणारा भाजप कोण? असा सवालही तिने उपस्थित केला. मात्र भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिलाचा टिकाव लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.