गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा, रुग्णालयातून परतल्या घरी
मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याकारणाने त्यांनी घरवापसी केली आहे.
भारताची शान, भारताचा अभिमान स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याकारणाने त्यांनी घरवापसी केली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, लता मंगेशकर यांना छातीत दुखू लागल्या कारणाने त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री दीड वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
येत्या 28 नोव्हेंबर रोजी लता मंगेशकर या 90 वर्षांच्या झाल्या. त्यांच्या जन्मदिनी अनेक दिग्गज कलाकारांनी लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यात धर्मेंद्र, हेमा मालिनी, ऋषी कपूर, माधुरी दिक्षित, ए. आर. रेहमान, श्रेया घोषाल आणि अनिल कपूर आदींचा समावेश होता.
हेदेखील वाचा- लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडूलकर याने व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या खास शुभेच्छा (Watch Video)
छातीत दुखू लागल्या कारणाने लता मंगेशकर यांना ब्रिच कँडी रुग्णालयात ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. काही तपासण्यांसाठी त्यांना अतिदत्रता विभागात दाखल करण्यात आले होते.