...म्हणून लता मंगेशकरांच्या वडीलांनी केली होती दोन लग्नं !
दोन सख्खा बहिणींसोबत दीनानाथांनी केला होता विवाह.
भारतरत्न लता मंगेशकर 90 व्या वर्षात पर्दापण करणार आहेत. गेली 8 दशकं आपल्या सुरेल गाण्यांनी रसिकांच्या मनात राज्य करणाऱ्या लतादीदींबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील. व्यावसायिक आयुष्यात त्यांनी यशाची शिखरं गाठली असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार संघर्षमय होतं. वडीलांच्या अकाली निधनामुळे बालपणात कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रिय गायक होते. त्याचबरोबर त्यांनी मराठी संगीत नाटकातूनही विविध भूमिका साकारल्या. ...असे पडले लता मंगेशकर हे नाव !
दीनानाथांची दोन लग्नं
दोन सख्खा बहिणींसोबत दीनानाथांनी विवाह केला होता. त्यांचे पहिले लग्न 1922 साली गुजरातच्या थलनेर गावातील नर्मदाबेन यांच्यासोबत झाले होते. नर्मदाबेन यांचे वडील हरिदास गुजरातमधील मोठे जमीनदार होते. ते नगरसेठ म्हणून ओळखले जायचे. मुळच्या मराठी असलेल्या दीनानाथांनी त्याकाळी गुजराती तरुणीसोबत लग्न करणे ही खूप मोठी गोष्ट होती. ... म्हणून लता मंगेशकर आयुष्यभर अविवाहित राहिल्या
...म्हणून केले दुसरे लग्न
लग्नाच्या चार वर्षानंतर आजारपणामुळे नर्मदाबेन यांचे निधन झाले. त्यानंतर 1927 साली दीनानाथ यांचे नर्मदाबेन यांची धाटकी बहीण शेवंतीबेन यांच्या सोबत लग्न झआले. लग्नानंतर शेवंतीबेन यांचे नाव बदलून सुधामती करण्यात आले. दीनानाथ आणि सुधामती यांना पाच मुले झाली- लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरही झाला होता विषप्रयोग