Bollywood Movie : महाराजनंतर जुनैद खानचा दुसरा चित्रपट खुशी कपूरसोबत; जाणून घ्या चित्रपटाची अपडेट्स

निर्मात्यांनी या दोघांच्या सिनेमाची अधिकृत घोषणा केली असली तरीही सिनेमाचं नाव अजून जाहीर केलं नाहीये. मात्र, सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 7 फेब्रुवारी 2025 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Photo Credit- X

Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan) याचा मुलगा जुनैद खान याने त्याच्या पहिल्याच चित्रपटात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या शांत आणि नम्र स्वभावाचे अनेकजण फॅन झाले आहेत. जुनैद खान (Junaid Khan)याचा काही महिन्यांपूर्वीच महाराज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यातील त्याच्या दमदार अभिनयाने चांगली कामगिरी केली सोबतच सगळ्यांची मनं जिंकली. आता जुनैद आणखी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यात त्याच्यासोबत श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर (Khushi Kapoor)दिसणार आहे. (हेही वाचा: Jigra Song Chal Kudiye: आलिया भट्ट स्टारर 'जिगरा' मधील 'चल कुडिये' हे गाणे रिलीज, चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये होणार दाखल)

खुशीने आर्चिज या सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल. तिचा हा सिनेमा फारसा यशस्वी ठरला नाही. खुशी आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुनैद आणि खुशी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. निर्मात्यांनी या दोघांच्या सिनेमाची अधिकृत घोषणा केली असली तरीही सिनेमाचं नाव अजून जाहीर केलं नाहीये. मात्र, सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 7 फेब्रुवारी 2025 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जुनैद आणि ख़ुशीच्या या आगामी सिनेमाच्या पोस्टर शेअर करत ही बातमी शेअर केली. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेला पोस्टरवर एक पाठमोऱ्या बसलेल्या तरुण-तरुणीचं चित्र आहे. यात तरुणीने त्या तरुणाच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं दिसत आहे. प्रेम, आवड आणि त्यामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी असं या सिनेमाच्या पोस्टरवर लिहिलेलं आहे. यावरून सध्याच्या तरुणाईच्या प्रेमाच्या व्याख्येवर हा सिनेमा आधारित असावा असा अंदाज आहे. अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif