Jr NTR Tested COVID Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण, ट्विटद्वारे दिली माहिती

त्याचबरोबर काळजी करून नका मी अगदी ठिक आहे असे ज्युनिअर एनटीआरने आपल्या चाहत्यांना संदेश दिला आहे.

Jr NTR (Photo Credits: Instagram)

हिंदी, मराठी सह अन्य भाषांतील सिनेसृष्टी कोरोनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीसह टॉलिवूडमधील देखील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला (Jr NTR) कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. स्वत: अभिनेत्याने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. सध्या तो होम क्वारंटाइन आहे. त्याचबरोबर काळजी करून नका मी अगदी ठिक आहे असे ज्युनिअर एनटीआरने आपल्या चाहत्यांना संदेश दिला आहे.

"माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. माझं संपूर्ण कुटुंब आणि मी घरात आयसोलेशमध्ये आहोत. आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहोत." असे ट्विट त्याने केले आहे.हेदेखील वाचा- Mohan Joshi Tests Positive For COVID 19: अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

"गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही करोना चाचणी करुन घ्या. सुरक्षित राहा,” अशा आशयाचे ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

ज्युनिअर एनटीआर आधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अल्लु अर्जुन, पवन कल्याण, राम चरण सारख्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती.

लवकरच ज्युनिअर एनटीआरला ‘RRR’ या चित्रपटात पाहता येणार आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर सोबत राम चरण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली आहेत. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारत आहे. तर राम चरण हा अल्लुरी सिताराम राजू ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त आलिया भट्ट, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे अनेक कलाकार यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.