८० वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनावर जोकरची मोहिनी कायम
जोकरच्या पात्राची अजूनही मोहिनी प्रेक्षकांवर आहे. आज त्या पात्राला 80 वर्ष झाली असूनही प्रेक्षकांच्या मनावर त्याची जादू आहे.
2 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या 'जोकर' ह्या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात 32.7 कोटींची कमाई केली आहे. 1940 साली लिहिल्या गेलेल्या 'जोकर' या पात्राची मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर आहे. 11 वर्षांपूर्वी आलेल्या 'द डार्क नाईट' ह्या बॅटमॅनच्या दुसऱ्या भागाने संपूर्ण जगात खळबळ उडवली होती. 'बॅटमॅन' हे डीसी कॉमिक्सचं पात्र. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत ह्या पात्राची मोहिनी प्रत्येकावरच आहे. पण चित्रपट प्रदर्शित झाला आणि अधिक प्रसिद्धी मिळाली ती त्या चित्रपटाच्या खलनायकाला, जोकरला. दुर्दैवाने ती भूमिका साकारणाऱ्या हिथ लेजरचा लगेचच मृत्यू झाला आणि ते पात्र एक वदंता बनून गेलं. 2 ऑक्टोबरला ह्याच पात्राचा प्रवास उलगडणारा 'जोकर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहांचा रस्ता धरला.
ह्या चित्रपटातला काळ हा 1980 च्या दशकातला आहे. जनता बेरोजगारी, गरिबीने त्रासलीये. सगळीकडे अनागोंदी माजलीये. अशातच ह्या 'गॉथम' शहरात मेयर पदाच्या निवडणूका येऊन ठेपल्यात. आणि त्यासाठी उमेदवारी भरलीये , थॉमस वेन ह्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत अशा उद्योजकाने. ह्या सर्व पार्श्वभूमीवर विदूषकाचं काम करणारा आर्थर फ्लेक जो अत्यंत गरीब परिस्थितीत आपल्या आईचा सांभाळ करतोय, आणि ज्याला हसण्याचा एक आजार आहे, त्याच्या कडे बंदूक आल्यावर कसा बदलतो आणि आजूबाजूची परिस्थिती कशी बदलवतो , ह्यावर पुढील तासभर आपण सुन्न होऊन पाहत राहतो. फ्लेकचा 'जोकर' होण्यापर्यंतचा प्रवास हिंस्र , थरारक आणि थक्क करणारा आहे. बाप नसल्याचं दुःख, आयुष्यभर सोसाव्या लागलेल्या अवहेलना , पाचवीला पुजलेली गरिबी ह्या सगळ्या मिश्रणावरचा त्याचा उद्रेक हा धडकी भरवणारा आहे.
टॉड फिलिप्स लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपल्याला हळू हळू त्याच्या भावविश्वात रुळावतो. गोष्टी काहीश्या संथ गतीने घडत असल्या तरीही त्या निरर्थक नाहीयेत . प्रत्येक कृतीमागे हेतू आहे . काही प्रसंग तर शहर आणणारे आहेत . फ्रिज मध्ये जाऊन बसण्याचा आणि शेवटचा प्रसंग तर खूपच प्रभाव पडतात. चित्रपटभर त्याने पिवळ्या आणि निळ्या वापर केलेला आहे , तसेच चित्रपट जसा शेवटाकडे जातो, आणि हिंसा वाढत जाते तसा वाढत जाणार लाल रंगाचा वापर खरंच कमाल आहे.
ब्रूस वेन ते बॅटमॅन ह्या प्रवासाला जोकर कारणीभूत असण्याचा लावलेला संदर्भ आणिक मजा आणतो . अर्थात बॅटमॅनचे आधीचे चित्रपट न पाहिलेली व्यक्तीसुद्धा हा चित्रपट पाहू शकते , इतका तो स्वतंत्र आहे. उत्तरार्धात गाठत जाणारी उंची शेवटच्या प्रसंगात शिखरावर्ती पोचते, आणि घरी जाताना आपण जोकर घरी घेऊन जातो. एक एक प्रसंग आपल्या मनावर कोरला गेलेला असतो कायमचाच.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)