दूरदर्शनवरील सुपरहिरो Shaktiman आता Amazon Prime वर
भारताचा पहिला सुपरहिरो अशी ओळख असलेला शक्तिमान (Shaktiman) आता पुन्हा अमेझॉन प्राईमच्या (Amazon Prime) माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
Shaktiman On Amazon Prime : 90 च्या दशकामध्ये ज्यांचं बालपण गेले असेल त्यांना शक्तिमान (Shaktiman) ठाऊक नाही हे थोडं अशक्यच आहे. भारताचा पहिला सुपरहिरो अशी ओळख असलेला शक्तिमान (Shaktiman) आता पुन्हा अमेझॉन प्राईमच्या (Amazon Prime) माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. दोन सीझनच्या स्वरूपात शक्तिमान (Shaktiman) ही सीरीज आता अमेझॉन प्राईमवर पहायला मिळणार आहे.
1997 ते 2005 या काळामध्ये शक्तिमान दुरदर्शनवर दर रविवारी दुपारी 12 वाजता प्रसारित होत होती. चिमुकल्यांसह कुटुंबातील प्रौढ मंडळींनीदेखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे. मुकेश खन्ना या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत झळकले होते. मुकेश खन्ना (Mukesh Khanna) गंगाधर (Gangadhar) आणि शक्तिमान (Shaktiman) अशी दोन पात्र साकारत होता.
‘कानून का दोस्त, मुर्जिमों का दुश्मन' किंवा 'सॉरी शक्तिमान' हे मालिकेतील खास संवाद आजही लोकांना नॉस्टेलजिक करून जातात. मालिकेत नेहमीच शेवटी एक खास संदेश दिला जात असे. त्यामुळे अनेकांच्या शक्तिमानसोबतच्या आठवणी खास आहेत. नव्वदीच्या दशकात या मालिकेने टेलिव्हिजनवर बक्कळ कमाई आणि लोकप्रियता कमावली होती.
नव्वदच्या दशकात आपण सार्यांनीच मालिका पाहिली असली तरीही अमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) मात्र ही मालिका 16+ प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आली आहे.