Priyanka Chopra Instagram Post Cost: इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा किती मानधन घेते? आकडा पाहून सर्वांचीच उडेल झोप
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) 'क्वांटिको' मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. तिला आपल्या प्रोजक्टमध्ये घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि निर्माते उत्सुक असतात. यातच ग्लोबल स्टार प्रियंकाचे मानधन चांगलेच वधारल्याचे समजत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) 'क्वांटिको' मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. तिला आपल्या प्रोजक्टमध्ये घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि निर्माते उत्सुक असतात. यातच ग्लोबल स्टार प्रियंकाचे मानधन चांगलेच वधारल्याचे समजत आहे. दरम्यान, प्रियंकाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच इन्स्टाग्राम रिच लिस्ट 2020 (Instagram Rich List 2020) ची यादीची घोषणा केली गेली आहे. या यादीतील नामांकित सेलिब्रेटींमध्ये प्रियंका 28 व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, प्रियंका ही केवळ चित्रपटांसाठीच नव्हेतर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठीदेखील तगडे मानधन घेतल असल्याची माहिती समोर आली आहे.
इंस्टाग्राम रिच लिस्ट 2020 मध्ये अमेरिकन सेलिब्रिटींचे वर्चस्व दिसून आले आहे. पहिल्या क्रमांकावर कायली जेनर आणि दुसर्या क्रमांकावर एरियाना ग्रान्डे आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला संपूर्ण यादी पाहिली तर प्रथम दहामध्ये तुम्हाला अमेरिकन सेलिब्रिटींचे वर्चस्व दिसेल. अशा परिस्थितीत प्रियंका चोप्राने एकमेव भारतीय सेलिब्रिटी म्हणून यादीत स्थान मिळवणे महत्वाचे ठरत आहे. इन्स्टाग्राम रिच लिस्ट 2020 च्या यादीमध्ये सेलिब्रिटींच्या रँकसह त्यांनी माध्यमातून किती कमाई केली? हे देखील स्पष्ट होते. महत्वाचे म्हणजे, इंस्टाग्रामवर केवळ पोस्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा 2.16 कोटी मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Shah Rukh Khan च्या 'Pathan' सिनेमाच्या सेटवरुन खास Photos Leak
फोटो-
दुसरीकडे, जर क्रीडा उद्योगाबद्दल चर्चा केली गेली तर इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये एकूण 24 लोकांना स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये विराट कोहलीला सहावा क्रमांक मिळाला आहे. या यादीत फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहली केवळ भारतच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगातील एकमेव ख्यातनाम व्यक्ती आहे, ज्यांचा या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर विराटने इंस्टाग्राम पोस्ट करण्यासाठी 1.35 कोटी शुल्क घेतले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2021 09:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

