Lata Mangeshkar यांना 'आनंदघन' हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या त्यामागील किस्सा

आनंदघन या नावाने लता दीदींनी संगीत दिलेली गाणी म्हणजे 'अखेरचा हा तुला दंडवत', 'ऐरणीच्या देवा तुला', ''रेशमाच्या रेघांनी',''माळाच्या मळामंधी' ही गाणी आहेत.

Lata Mangeshkar | PC: Twitter

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आज (6 फेब्रुवारी) सकाळी 8.12 वाजता अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये त्यांची मागील 28 दिवसांपासून सुरू असलेली झुंज संपली आहे. दरम्यान त्यांना कोविड 19 आणि न्युमोनिया चे निदान झाले होते. त्यावर त्यांनी मात केली पण नंतर प्रकृती बिघडल्याने त्यांचं आज निधन झाले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे निधन मल्टी ऑर्गन फेल्युअर मुळे झाले आहे.

लता मंगेशकर या केवळ गायिका नव्हत्या. संगीतावर प्रेम करणार्‍या लता मंगेशकर या गायिका, दिगदर्शिका, संगीतकार, छायाचित्रकार आणि क्रिकेटप्रेमी होत्या. दरम्यान त्यांनी 'आनंदघन' या नावाने चित्रपटाला संगीत दिले आहे. हे देखील नक्की वाचा: Lata Mangeshkar Passes Away: स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना पहिल्या कमाईत मिळाले होते 25 रुपये, 'या' कारणामुळे केलं नाही लग्न.

लता मंगेशकर यांचा 'आनंदघन' टोपणनावामागील किस्सा

लता मंगेशकर यांनी 'आनंदघन' या नावाने संगीत दिले आहे. दरम्यान ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेल्या किस्सा नुसार, लता मंगेशकर यांना 'आनंदघन' हे नाव समर्थ रामदासांचे स्फुट काव्‍य 'आनंदवनभुवन' गाण्यामधून सुचलं आहे. भालजी पेंढारकर यांनी त्यांना हे नाव दिले नव्हते तर त्यांनी लता दीदींना दिलेलं नाव जयशंकर होते.

दरम्यान आनंदघन या नावाने लता दीदींनी संगीत दिलेली गाणी म्हणजे 'अखेरचा हा तुला दंडवत', 'ऐरणीच्या देवा तुला', ''रेशमाच्या रेघांनी',''माळाच्या मळामंधी' ही गाणी आहेत. 1950  साली 'राम राम पाहुणं' हा त्यांचा संगीतकार म्हणून पहिला सिनेमा होता.