Will Smith कडून Oscars 2022 मध्ये Chris Rock ला लगावलेल्या कानशिलात प्रकाराबाबत माफीनामा जारी
विल स्मिथ ची पत्नी Jada Pinkett Smith च्या जाडपणावर केलेल्या विनोदावर भडकून 94th Academy Awards दरम्यान कॉमेडियन क्रिस रॉकच्या श्रीमुखात भडकवली होती.
अमेरिकेत लॉस एंजेलिस च्या Dolby Theatre रविवार (27 मार्च) च्या रात्री यंदा 94 वा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2022 ) सोहळा रंगला. या पुरस्कार सोहळ्याची सध्या चर्चा आहे ती अमेरिकन अभिनेता विल स्मिथने (Will Smith ) क्रिस रॉक (Chris Rock) च्या लगावलेल्या कानशिलात प्रकरणाबददल. विल स्मिथने या पुरस्कार सोहळ्यात त्याच्या पत्नीवरून केलेल्या विनोदावर भडकून भर कार्यक्रमामध्ये रॉकच्या कानाखाली लगावली होती. या प्रकाराची नंतर सर्वत्र चर्चा झाली. जगभरात लोकांनी यावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर विल स्थिमने आपलं वागणं चूकीचे असल्याचं मान्य करत रॉकची माफी मागितली आहे. त्याने इंस्टाग्राम पोस्ट लिहित याबाबत खुलासा केला आहे.
विल स्मिथने लिहलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याने लिहले, ' प्रेम आणि दयाळूपणा यांनी भरलेल्या या जगात हिंसेला जागा नाही. माझं वागणं चूकीचे आणि नियमांना धरुन नव्हते. कोणत्याही प्रकारची हिंसा ही निषेधार्थ आहे. पत्नी Jada च्या वैद्यकीय कारणांमुळे झालेला विनोद मी सहन करू शकलो नाही आणि इमोशनल होऊन रिअॅक्ट झालो.'
Will Smith ची पोस्ट
दरम्यान विल स्मिथ ची पत्नी Jada Pinkett Smith काल त्याच्यासोबत पुरस्कार सोहळ्याला हजर होती. सुरूवातीला रॉकच्या विनोदांवर ती हसताना दिसली. मात्र Alopecia Areata या आजारामुळे तिच्या केसगळतीवरून करण्यात आलेल्या विनोदावर तिचाही मूड बिनसला आणि विल स्मिथने थेट स्टेजवर जाऊन रॉकच्या कानाखाली वाजवली. विल स्मिथच्या हिंसक प्रतिक्रियेनंतर यंदाच्या बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार देखील त्याला मिळाला त्यावेळी देखील त्यानी माफी मागितली. Oscars 2022 Winners List: सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकापर्यंत ऑस्कर 2022 विजेत्यांची संपूर्ण यादी पहा येथे .
रॉक हा स्टॅन्डप कॉमेडियन आहे. ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथसोबत झालेल्या प्रकारानंतर त्याच्या आगामी शो च्या तिकीटांमध्येही वाढ बघायला मिळाली आहे. TickPick या तिकीट बुकींग साईटने दिलेल्या माहितीनुसार रविवार रात्रीच्या प्रकारानंतर त्याच्या शो कडे गर्दी वाढली आहे. 18 मार्चला त्याच्या शोची किमान किंमत USD 46 होती आता ती USD 341झाली आ हे . रॉकचे येत्या बुधवार, गुरूवार, शुक्रवारी लागोपाठ Wilbur Theatre मध्ये शो आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)