खुशखबर! Game of Thrones चा प्रीक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीला; HBO ने प्रसिद्ध केला लोगो, पहा काय असेल कथा (Photo)

‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones). काही महिन्यांपूर्वीच या सिरीजचा शेवटचा सिझन प्रसिद्ध झाला होता. मात्र आता या शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच एचबीओ नेटवर्क (HBO Netrwork) गेम ऑफ थ्रोन्स’ या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रीक्वेल घेऊन येत आहे.

Game of Thrones' new prequel on House Targaryen (Photo Credits: Instagram)

90 च्या दशकातील ‘फ्रेंड्स’ (FRIENDS) नंतर टीव्ही जगतात जो शो सर्वात लोकप्रिय ठरला तो म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones). काही महिन्यांपूर्वीच या सिरीजचा शेवटचा सिझन प्रसिद्ध झाला होता. मात्र आता या शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच एचबीओ नेटवर्क (HBO Netrwork) गेम ऑफ थ्रोन्स’ या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रीक्वेल घेऊन येत आहे. या प्रीक्वेलचे नाव ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ (House of the Dragon) असे असणार आहे. हा शो गेम ऑफ थ्रोन्समध्ये दाखवण्यात आलेल्या घटनांच्या 300 वर्षे आधी सेट करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या शोमध्ये चाहत्यांना ‘हाऊस ऑफ टारगॅरिन’ची कहाणी पाहायला मिळणार आहे. नुकताच या शोचा लोगो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हाऊस ऑफ ड्रॅगन हा जॉर्ज आरआर मार्टिनच्या फायर आणि ब्लड या पुस्तकावर आधारित असणार आहे. सध्यातरी या सिरीजमध्ये एकूण 10 एपिसोड असल्याची माहिती मिळत आहे. एचबीओ मॅक्स (HBO Max) बद्दलच्या कार्यक्रमात एचबीओने हाऊस ऑफ ड्रॅगनची घोषणा केली. या नवीन शोमध्ये सुमारे तीनशे वर्षांमधील डेनिरिज आणि तिच्या पूर्वजांसंदर्भातील घटना पाहायला मिळातील. ही एकूण दहा एपिसोडची कथा असणार आहे. याबाबत बोलताना एचबीओ प्रोग्रामिंग अध्यक्ष केसी ब्लॉयस म्हणाले, ‘गेम ऑफ थ्रोन्सचे कथाविश्व खूप समृद्ध आहे. आम्ही आता हाऊस टारगॅरीनचे मूळ सोबत रायन, जॉर्ज यांच्यासमवेत वेस्टरोसच्या आधीच्या दिवसांचा शोध घेण्यास उत्सुक आहोत.’

गेम ऑफ थ्रोन्सचा शेवटचा सिझन संपल्यावर एचबीओने घोषणा करत नाओमी वॅट्स सोबत प्रीक्वल करण्यार असल्याची घोषणा केली होती. या सीरीजमध्ये गेम ऑफ थ्रोन्सच्या आधीच्या 1000 वर्षांपूर्वीच्या घटनाच समावेश असणार होता. मात्र ऐनवेळी हा प्रकल्प रद्द करून एचबीओने हाऊस ऑफ ड्रॅगन बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now