Singer Coco Lee Dies: गायिका कोको लीचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर गायिका गेली होती कोमात
कोकोने नैराश्याशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लीने आठवड्याच्या शेवटी घरी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ती कोमात होती आणि बुधवारी तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात गायिकेच्या बहिणीने माहिती दिली आहे.
Singer Coco Lee Dies: हाँगकाँगमध्ये जन्मलेली गायिका आणि गीतकार कोको ली (Coco Lee) ने आत्महत्या (Suicide) करून आपलं जीवन संपवल आहे. कोको लीने 48 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लीच्या मोठ्या बहिणी कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी बुधवारी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून तिची प्रकृती खूपच खालावली होती.
कोकोने नैराश्याशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लीने आठवड्याच्या शेवटी घरी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ती कोमात होती आणि बुधवारी तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात गायिकेच्या बहिणीने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Heart Of Stone: 'आलिया भट्ट'चे हाॅलिवूड चित्रपटात पदार्पण; ट्रेलरमुळे व्हिलनचा लुक पाहून चाहते म्हणाले शानदार)
हाँगकाँगमध्ये फेरेन लीचा जन्म झाला, ली नंतर यूएसला गेली जिथे तिने सॅन फ्रान्सिस्कोमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. हाँगकाँगमध्ये प्रसारक TVB द्वारे आयोजित वार्षिक गायन स्पर्धेत प्रथम उपविजेते झाल्यानंतर ती गायिका बनली आणि 1994 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी तिचा पहिला अल्बम रिलीज झाला.
लीने सुरुवातीला मँडोपॉप गायिका म्हणून सुरुवात केली असली तरी नंतर तिने तिच्या जवळपास 30 वर्षांच्या कारकिर्दीत कँटोनीज आणि इंग्रजीमध्ये अल्बम रिलीज केले. ती तिच्या दमदार आवाजासाठी आणि लाइव्ह परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध होती.
कोको अमेरिकन मार्केटमध्ये प्रवेश करणारी ती पहिली चीनी गायिका देखील होती. तिचे इंग्रजी गाणे "डू यू वॉन्ट माय लव्ह" डिसेंबर 1999 मध्ये बिलबोर्डच्या हॉट डान्स ब्रेकआउट्स चार्टवर #4 वर आले. 2011 मध्ये, लीने ब्रूस रॉकोविट्झ या कॅनेडियन उद्योगपतीशी लग्न केले जे हाँगकाँग पुरवठा साखळी कंपनी ली आणि फंगचे माजी सीईओ आहेत. रॉकोविट्झसोबतच्या लग्नानंतर तिला दोन सावत्र मुली होत्या, पण लीला स्वतःची मुले नव्हती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)