१०० कोटींच्या कारमधून प्रवास करतात मिस्टर बीन !

आजही लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर मिस्टर बीन म्हणूनच ओळखतात.

मिस्टर बीन (Photo Credit- Instagram)

९० च्या दशकात लोकप्रिय टीव्ही शो मिस्टर बीन म्हणून अभिनेते रोवन एटकिंसन घराघरात पोहचले. त्यांच्या निरागस, विनोदी अभिनयाने त्यांनी स्वतःची खास ओळख निर्माण केली. आजही लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर मिस्टर बीन म्हणूनच ओळखतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रोवन यांच्या निधनाची अफवा पसरली होती. पण रोवन एकदम ठणठणीत असून अगदी सुखवस्तू आयुष्य जगत आहेत.

# मिस्टर बीन म्हणजेच रोवन एटकिंसन हे ८ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी ते एक आहेत.

# लंडन येथे त्यांचे आलिशान घर असून त्याची किंमत कोटींच्या घरात आहे. इतकेच नाही तर त्यांच्याकडे जगातील सर्वात महागडी कार मॅकलॉरेन एफ-१ (mclaren F1 car)आहे.

# १९९० च्या सुरुवातीच्या काळात मॅकलॉरेन एफ-१ ची किंमत ५ लाख ४० हजार युरो होती. आजच्या काळात या कारची किंमत सुमारे ८० ते १०० कोटींच्या घरात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif