पॉप सिंगर जस्टिन बिबर हेली बाल्डविनसोबत लग्नबंधनात; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

कॅनडियन पॉप सिंगर जस्टिन बिबरने अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविन सोबत लग्न केले.

जस्टिन बीबर आणि हेली बाल्डविन (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही लग्नाचे वारे वाहू लागले असल्याचे दिसून येत आहे. कॅनडियन पॉप सिंगर जस्टिन बिबरने (Justin Bieber) अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविन (Hailey Baldwin) सोबत लग्न केले.

जस्टिन आणि हेली यांच्या वाढत्या जवळीकतेच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र याबद्दल जस्टिनने मौन बाळगले होते. मात्र इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत जस्टिनने या नात्याचा खुलासा केला आहे.

जस्टिनने हेलीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, 'माय वाईफ इज ऑसम.'  या फोटोत जस्टिनने लाल रंगाचे टी शर्ट घातले असून कॅनडीड मूडमध्ये हा फोटो क्लिक झाला आहे. हा फोटो म्हणजे जस्टिनच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे.

 

View this post on Instagram

 

My wife is awesome

A post shared by Justin Bieber (@justinbieber) on

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर रोमांटिक अंदाजात जस्टिन आणि हेली.

 

View this post on Instagram

 

Hunny buns punkin

A post shared by Justin Bieber (@justinbieber) on

लग्नानंतर हेलीने सोशल मीडियावर आपले नावही बदलले.

आपल्या गाण्यांनी अनेक तरुणींची मनं जिंकणाऱ्या जस्टिन बिबरने मे 2018 मध्ये हॅलेसोबत साखरपूडा केला होता. जस्टिनने हॅलेला बहामा आयलँडवर लग्नाची मागणी घातली. त्यावेळी हॅलेने लगेचच जस्टिनला होकारही दिला होता.