Oscar 2020 ची नामांकने जाहीर! 'जोकर' सिनेमाचा बोलबाला; तर भारताचा 'द लास्ट कलर' बेस्ट फिचर फिल्मच्या स्पर्धेत कायम
चित्रपट दुनियेतील सर्वात मोठा पुरस्कार 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कारांची (Oscar Awards) नामांकने जाहीर झाली आहेत. 10 फेब्रुवारी रोजी (भारतीय वेळेनुसार) हा ऑस्कर सोहळा रंगणार आहे.
चित्रपट दुनियेतील सर्वात मोठा पुरस्कार 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कारांची (Oscar Awards) नामांकने जाहीर झाली आहेत. 10 फेब्रुवारी रोजी (भारतीय वेळेनुसार) हा ऑस्कर सोहळा रंगणार आहे. यंदाच्या ऑस्कर नामांकनात सर्वोत्तम सिनेमा, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेता, ओरिजनल स्कोर, संकलन, सिनेमॅटोग्राफी, पटकथा अशा सात विभागांमधील नामांकनांमध्ये 'जोकर' (Joker) ने बाजी मारली आहे.तर, क्विंटन टरँटिनोचा 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड' (Once Upon Time In Hollywood) ऑस्करच्या स्पर्धेत तोडीस तोड दिसून येत आहे.
भारताकडून शेफ ते फिल्ममेकर प्रवास करणाऱ्या विकास खन्नाचा 'द लास्ट कलर' हा पदार्पणातील सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांची यात प्रमुख भूमिका आहे. बेस्ट फिचर फिल्म कॅटेगरीत हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.
पहा ऑस्कर 2020 नामांकनांची यादी
Congratulations to the Best Picture nominees! #OscarNoms pic.twitter.com/Wqgdoe62Gs
— The Academy (@TheAcademy) January 13, 2020
दरम्यान, भारताकडून ऑस्कर साठी पाठवण्यात आलेला गल्ली बॉय हा पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर झाला होता, तसेच सर्वोत्कृष्ट माहितीपट या गटात भारताच्या मोती बाग (Moti Bagh) या डॉक्युमेंट्रीला देखील स्थान प्राप्त झाल्याचे समजत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)