Grammy Awards 2020: मिशेल ओबामा आणि लेडी गागा यांनी जिंकला यंदाचा ग्रैमी अवॉर्ड; पाहा संपूर्ण यादी
2006 मध्ये‘ड्रीम्स फ्रॉम माई फादर’ आणि 2008 मध्ये ‘द ऑडेसिटी ऑफ होप’साठी ओबामा यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
Grammy Awards 2020: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा (Barack Obama) यांच्या पत्नी मिशेल ओबामा (Michelle Obama) आणि जगप्रसिद्ध गायिका लेडी गागा (Lady Gaga) यांना यंदाचा ग्रैमी अवार्ड मिळाला आहे. हॉलिवुड आणि जगभरातील संगित क्षेत्रामध्ये ग्रैमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा समजला जातो. मिशेल ओबामा यांना त्यांच्या ‘बिकमिंग’ ऑडियो बुकसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तर, 'I'll Never Love Again'या गाण्यासाठी लेडी गागा हिला हा अवॉर्ड मिळाला. बेस्ट सॉन्ग फॉर व्हिज्युअल मीडियासाठी लेडी गागा हिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे गाणे A Star is Born चित्रपटातील आहे. विशेष म्हणजे ज्या पुरस्काराने मिशेल ओबामा यांना गौरविण्यात आले त्याच पुरस्काने त्यांचे पती बराक ओबामा यांना 2006 मध्ये गौरविण्यात आले होते. 2006 मध्ये‘ड्रीम्स फ्रॉम माई फादर’ आणि 2008 मध्ये ‘द ऑडेसिटी ऑफ होप’साठी ओबामा यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
अमेरिकेमध्ये सोमवारी (27 जानेवारी 2020) या दिवशी 62 व्या ग्रैमी अवार्ड समारंभाचे आयोजन करण्या आले होते. एलिसिया कीज ने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्यात अमेरिकन रॅपर निप्से याला ग्रॅमी अवॉर्ड देऊन मरणोत्तर गौरविण्यात आले. एखाद्या कलाकाराला मरणोत्तर ग्रैमी अवॉर्ड देऊन गौरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. निप्से याला त्याच्या ‘रैक्स इन द मिडिल’ गाण्यासाठी हा अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी निप्से याची आई, भाऊ आणि त्याचे निकटवर्तीय उपस्थित होते. (हेही वाचा, पामेला एंडरसन पाचव्यांदा बोहल्यावर, वयाच्या 52 व्या वर्षी 72 वर्षीय व्यक्तीसोबत केले लग्न)
ग्रॅमी अवॉर्ड ट्विट
लेडी गागा हिचे 'आई विल नेवर लव अगेन' ऑक्टोबर 2018 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आले होते. युट्युबवर हे गाणे आतापर्यंत तब्बल 200 मिलियन पेक्षाही अधिक युजर्सनी पाहिले आहे. लेडी गागा ही जगप्रसिद्ध गायिका असते. ती नेहमीच प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरते. प्रतिथयश गायिका तर आहेच परंतू त्यासोबतच ती गीतकार, अभिनेत्री, मॉडेलसुद्धा आहे.लेडी गागा हिने हा पुरस्कार आपला सहकारी मार्क रोनसन, एंड्र्यू व्हाईट आणि एंथनी रोसोमांडो यांच्यासोबत विभागून घेतला आहे. तसेच, सह-अभिनेता दिग्दर्शक ब्रैडली कूपर यालाही अनेक धकन्यवाद दिले आहेत. (ग्रैमी अवॉर्ड विजेत्यांची संपूर्ण यादीग्रैमी अवॉर्ड विजेत्यांची संपूर्ण यादी पीडीएफ रुपात इथे पाहा. )
ग्रैमी अवॉर्ड ट्विट
दरम्यान, याच कार्यक्रमात बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायन आणि त्याची मुलगी गियाना मारिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोबी ब्रायन यांचा आजच झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि इतर आकरा लोक प्रवास करत होते. या सर्वांचा अपघाती मृत्यू झाल.