मायकेल जॅक्सन याच्या कंपनीने HBO चॅनलवर ठोकला 700 कोटी रुपयांचा दावा

मायकेल जॅक्सन याला बालपणापासूनच पॉप संगीतात आवड होती. त्याने पॉप संगीताला एक वेगळीच ओळख दिली. त्याचा कार्यक्रम सुरु असताना मूनवॉक डान्स आणि पॉप म्युझिक तरुणाईला थिरकायला लावत असे.

Michael Jackson | (Photo credit: archived, edited, representative image)

अमेरिकेचा दिवंगत पॉप स्टार मायकेल जॅक्सन (Michael Jackson) यांच्या संस्थेने एका चॅनलवर 10 कोटी डॉलर ( भारतीय रुपयांत तब्बल 700 कोटी रुपय) इतक्या रकमेचा दावा ठोकला आहे. आक्षेपार्ह डॉक्युमेंट्री फिल्म बनविल्याबद्दल मायकेलच्या कंपनीने हे पाऊल उचलले आहे. मायकेल जॅक्सन एस्टेटचे म्हणणे असे की, एचबीओ चॅनल दिवंगत पॉप स्टार मायकेल जॅक्सन याची मानहानी करणारी डॉक्युमेंट्री 'लीविंग नेवरलैंड' (Leaving Neverland) प्रदर्शित करणार आहे.

'लीविंग नेवरलैंड'वर यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत. यात मायकेल जॅक्सन याच्या लैंगिक अत्याचाराची शिकार ठरल्याचे दोन व्यक्तिंना दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे प्रसारणच होऊ नये यासाठी मायकेलच्या कंपनीने चॅनलवर दावा ठोकला आहे. चॅनलने दोन भागात बनवलेली ही डॉक्युमेंट्री तीन आणि चार मार्चला प्रसारित करणार असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. चॅनलने म्हटले आहे की, मायकेलच्या कंपनीने दाखल केलेल्या दाव्याचा आणि 'लीविंग नेवरलैंड'च्या परदर्शानाचा काही संबंध नाही. 'लीविंग नेवरलैंड' ठरल्या वेळी लॉन्च होणारच.

मायकेल जॅक्सन याचा 26 जून 2009 मध्ये अतिरिक्त मात्रेत ड्रग्ज घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. मायकेल जॅक्सन याला बालपणापासूनच पॉप संगीतात आवड होती. त्याने पॉप संगीताला एक वेगळीच ओळख दिली. त्याचा कार्यक्रम सुरु असताना मूनवॉक डान्स आणि पॉप म्युझिक तरुणाईला थिरकायला लावत असे. (हेही वाचा, अबब ! मृत्युनंतरही अब्जावधींची कमाई करत आहेत ही मंडळी; मायकल जॅक्सन पहिल्या स्थानावर)

2009 मध्ये जॅक्सन याच्या मृत्यूनंतर 2014मध्ये त्याच्या अप्रकाशित (अनरीलिज्ड) गीतांचा संग्रह करुन एक अल्बम काढण्यात आला. मायकेलचा डान्स आणि त्याचे गीत, संगीत जगभरातील अनेक देशांमद्ये लोकप्रिय राहिले आहे. मायकेलच्या मृत्यूनंतरही त्याची जादू आजही तरुणाच्या हृदयावर राज करते. म्यूझिकला व्हिडिओपर्यंत घेऊन जाण्याचे श्रेयही मायकेललाच जाते. 1979 मध्ये आलेला त्याचा अल्बम 'ऑफ द वॉल'मध्ये त्याचे दोन म्युझिक व्हिडिओ " डोंट स्टाप टिल यू गेट इनफ" आणि "रॉक विद यू" प्रचंड लोकप्रिय झाले.