Honeymoon With Ghost: लोकप्रिय गायिकेने केले भूताशी लग्न; आता म्हणते- 'त्याने हनिमून खराब केला', जाणून घ्या काय आहे प्रकरण
मात्र यासाठी प्रत्येकवेळी ब्रोकार्डेलाच पैसे द्यावे लागत होते. त्यांच्या हनीमूनवेळीही हीच गोष्ट घडली.
तुम्ही आजवर अनेक विचित्र घटना ऐकल्या असतील, पण माणसाचे भूताशी (Ghost) लग्न झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? याचा जिवंत पुरावा म्हणजे ब्रिटनमधील एक महिला गायिका. या गायिकेने गेल्या महिन्यात हॅलोविनच्या प्रसंगी एका 'भूता'शी लग्न करून सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, आता या महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या भूत पतीने तिचा हनीमून खराब केला.
ऑक्सफर्डशायरमधील 38 वर्षीय गायिका आणि गीतकार ब्रोकार्डने (Brocarde) ज्या 'भूत'शी लग्न केले आहे तो व्हिक्टोरियन काळातील सैनिक होता. एडुआर्डो नावाच्या या भूतप्रेमीला ब्रोकार्डे तेव्हा भेटली, जेव्हा तो गेल्या वर्षी तिच्या बेडरूममध्ये अचानक दिसला. यानंतर एडवर्ड रोज त्याच्या बेडरूममध्ये दिसू लागला. या दरम्यान ब्रोकार्डे कधी त्याच्या प्रेमात पडली हे तिलाच समजले नाही. ब्रोकार्डे म्हणते की, एडुआर्डोला भेटण्यापूर्वी तिचाही भुतांवर विश्वास नव्हता, परंतु त्याच्या आगमनानंतर तिचे आयुष्य पूर्णतः बदलले.
ब्रोकार्डने गेल्या महिन्यात लंडनमधील 'द एसायलम चॅपल'मध्ये हॅलोविनवेळी तिचा भूत प्रियकर एडुआर्डोशी लग्न केले होते. आता माहिती मिळत आहे की, या गायिका महिलेचा पती आता तिच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. या पतीने ब्रोकार्डेचा हनिमून खराब केला आहे. ब्रोकार्डेने सांगितले की, तिच्या व्हिक्टोरियन भूत पती एडवर्डोने कथितपणे वेल्समधील त्यांच्या हनीमूनदरम्यान मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले. महत्वाचे म्हणजे, या सर्वांसाठी तिलाच पैसे द्यावे लागले. डेलीस्टारने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: 'होय, हे माझ्याच पतीचे लिंग', महिलेच्या सहकार्यामुळे पोलिसांची मदत, आरोपी गजाआड, लैंगिक अत्याचारग्रस्तांना न्याय)
ब्रोकार्डेने सांगितले की, तिच्या पतीला बाहेर जाणे, रेस्टॉरंट्समध्ये खाणे, मद्य पिणे अशा सर्व गोष्टी आवडतात. मात्र यासाठी प्रत्येकवेळी ब्रोकार्डेलाच पैसे द्यावे लागत होते. त्यांच्या हनीमूनवेळीही हीच गोष्ट घडली. दरम्यान, ब्रोकार्डे सांगते की, लग्नावेळी त्यांना एकही चर्च किंवा साक्षीदार मिळत नव्हता. कोणताच पाद्री त्यांचे लग्न लावण्यास तयार नव्हता. त्यांना अनेक चर्चमधून हाकलून देण्यात आले होते.