Vin Diesel Accused of Sexual Harassment: हॉलिवूड स्टार विन डिझेलवर माजी सहाय्यकाने केला लैंगिक छळाचा आरोप, गुन्हा दाखल

अभिनेत्याच्या माजी सहाय्यकाने गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये खटला दाखल केला. यामध्ये अस्टा जोनासनने दावा केला आहे की, 2010 मध्ये अटलांटा येथे 'फास्ट फाइव्ह'च्या सेटवर काम करत असताना विनने तिचा लैंगिक छळ केला होता. तिने दावा आहे की, 2010 मध्ये डिझेलने तिला हॉटेलच्या खोलीत भिंतीवर ढकलले आणि तिच्यासमोर आक्षेपार्ह कृत्य केले.

Hollywood star Vin Diesel (Photo Credit - Facebook)

Vin Diesel Accused of Sexual Harassment: प्रसिद्ध हॉलिवूड स्टार विन डिझेल (Vin Diesel)वर लैंगिक शोषणाचे (Sexual Harassment) आरोप करण्यात आले आहेत. 'फास्ट अँड फ्युरियस' फेम अभिनेत्यावर त्याची माजी सहाय्यक अस्टा जोनासनने (Asta Jonasson) लैंगिक छळाचा आरोप केला आहे. कायदेशीर तक्रारीत जोनासनने अभिनेत्यावर तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. माजी सहायकाने गुरुवारी फिर्याद दाखल केली. यामध्ये आणखी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

2010 मध्ये घडली होती घटना -

अभिनेत्याच्या माजी सहाय्यकाने गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये खटला दाखल केला. यामध्ये अस्टा जोनासनने दावा केला आहे की, 2010 मध्ये अटलांटा येथे 'फास्ट फाइव्ह'च्या सेटवर काम करत असताना विनने तिचा लैंगिक छळ केला होता. तिने दावा आहे की, 2010 मध्ये डिझेलने तिला हॉटेलच्या खोलीत भिंतीवर ढकलले आणि तिच्यासमोर आक्षेपार्ह कृत्य केले. (हेही वाचा - xXx: Return of Xander Cage; Vin Diesel सोबत पुन्हा दिसणार दीपिका पादुकोण)

कायदेशीर तक्रारीत माजी सहाय्यकाने म्हटले आहे की, विनच्या कंपनीने तिला अनेक कामे करण्यास सांगितले होते. यामध्ये सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी डिझेलची व्यवस्था करणे आणि त्याच्यासोबत असणे तसेच विनसोबत कार्यक्रमांना उपस्थित राहणे यांचा समावेश होता. (वाचा - Rashmika Mandana Deep Fakes: रश्मिका मंदानाच्या डीप फेक प्रोफाईल मध्ये 4 संशयित ताब्यात; मुख्य आरोपीचा शोध सुरू)

खटल्यानुसार, सप्टेंबर 2010 मध्ये रात्री उशिरानंतर, जोनासनला सेंट रेगिस हॉटेलमधील डिझेलच्या हॉटेलच्या खोलीत थांबण्यास सांगण्यात आले. जेव्हा अभिनेता परत आला तेव्हा त्याने जोनासनसोबत गैरवर्तन केले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now