Emmy Awards 2024 Winners List: एमी अवॉर्ड्स विजेत्यांची यादी जाहीर; कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता? कोणत्या श्रेणींमध्ये कोणाला मिळाले पुरस्कार? पहा संपूर्ण यादी

यावेळी युजीन लेव्ही आणि डॅन लेव्ही यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नामांकनाबद्दल बोलायचे झाले तर 'शोगन' आणि 'द बेअर' ने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

star Hiroyuki Sanada (फोटो सौजन्य - X/@Variety)

Emmy Awards 2024 Winners List: 76 व्या प्राइमटाइम एमी अवॉर्ड्स विजेत्यांची यादी (Emmy Awards 2024 Winners List) जाहीर झाली आहे. जेरेमी ऍलन (Jeremy Allen) ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. सर्व श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लॉस एंजेलिस येथील पीकॉक थिएटरमध्ये 76 व्या प्राइमटाइम एमी अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युजीन लेव्ही आणि डॅन लेव्ही यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नामांकनाबद्दल बोलायचे झाले तर 'शोगन' आणि 'द बेअर' ने आपला दबदबा कायम ठेवला आहे. यावर्षी शोगनला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत.

नामांकित सेलिब्रिटींव्यतिरिक्त पुरस्कार सादर करण्यासाठी यावेळी व्हायोला डेव्हिस, कॉलिन फॅरेल, जोशुआ जॅक्सन, डॉन जॉन्सन, मिंडी कलिंग, जॉन लेगुइझामो, जॉर्ज लोपेझ, स्टीव्ह मार्टिन, मार्टिन शीन, डिक व्हॅन डायक आणि क्रिस्टन विग हे कलाकार उपस्थित होते. (हेही वाचा - Grammy Awards 2024: Shankar Mahadevan यांच्या 'शक्ती' बॅन्डच्या 'This Moment'ने जिंकला Best Global Music Album!)

एमी अवॉर्ड्स 2024 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

'शोगन'ने जिंकले 14 पुरस्कार -

'शोगुन' ने 76 व्या प्राइमटाइम एमी अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकले. या स्पर्धेत ‘शोगन’ने 14 पुरस्कार पटकावले आहेत. गेल्या आठवड्यात क्रिएटिव्ह आर्ट्स एमीमध्ये दोन रात्री विजेत्यांची घोषणा करण्यात आली, रुडॉल्फने 'बिग माऊथ' वर त्याच्या आवाजाच्या कामासाठी सहावा एमी पुरस्कार जिंकला. तसेच, जेमी ली कर्टिसने 'द बेअर' मधील तिच्या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील जिंकला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif