Comedian Trevor Noah भारत दौऱ्यावर, कार्यक्रमाबद्दल घ्या जाणून
विनोदी कलाकार जगप्रसिद्ध कॉमेडीयन ट्रेवर नोहा भारत दौऱ्यावर येत आहे. Off The Record Tour कार्यक्रमाच्या माध्यमातून तो दिल्ली, बंगळुरु आणि मुंबई येथील चाहत्यांना भेटणार आहे.
Trevor Noah Comedy Program In India: जगप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन ट्रेव्हर नोह भारत दौऱ्यावर येत आहे. बहुप्रतीक्षित 'ऑफ द रेकॉर्ड टूर' च्या (Off The Record Tour) निमीत्ताने तो भारतातील चाहत्यांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतातील हा त्याचा पहिलाच दौरा असून होत असलेल्या प्रचंड मागणीमुळे त्याच्या दौऱ्याचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन 2022 आणि सुरु असलेल्या 2023 मध्ये यूएस आणि युरोपमध्ये तिकीटबारीवर सर्वाधिक विकला गेलेला विनोदी कार्यक्रम म्हणूनही ट्रेव्हर नोह याच्या नावावर एक विक्रमी कामगिरी नोंदली गेली आहे.
Trevor Noah म्हणजे व्यंगात्मक भाष्य आणि चिमटे
ट्रेव्हर नोव्ह याचे कार्यक्रम काहीसे व्यंगात्मक भाष्य, चिमटे आणि टोलेबाजी यांनी भारलेले असतात. ज्यामुळे लहानथोर आणि अबालवृद्ध हसून लोटपोट होतात. भारताच्या संस्कृतीवर मी नितांत प्रेम करतो. मला आवडत्या असलेल्या काही देशांपैकी एक भारत आहे. या देशाच्या दौऱ्यासाठी आपण उत्सुक आहोत अशी भावनाही नोव्ह याने व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Who is Neelam Gill: नीलम गिल कोण आहे? भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत आहे हॉलिवूड स्टार Leonardo DiCaprio's)
अटलांटा येथून 'ऑफ द रेकॉर्ड टूर' सुरु
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, 'ऑफ द रेकॉर्ड टूर' 20 जानेवारी 2023 रोजी अटलांटा येथे सुरु झाली. जी पुढे यूएसमधील विविध ठिकाणे पार करुन भारत, आशिया खंडाद्वारे पुढे दुबईला रवाना होईल. 20 जानेवारी 2023 रोजी अटलांटा येथे सुरू झालेली 'ऑफ द रेकॉर्ड टूर' आता भारत, आशिया आणि यूएसएमधील विविध ठिकाणे पार करेल. ब्लॅक डॉग सोडा आणि कोटक व्हाईट क्रेडिट कार्डद्वारे समर्थित इंडिया टूर सादर केली जाते. भारतामध्ये ब्लॅक डॉग सोडा आणि कोटक व्हाईट क्रेडिट कार्डद्वारे ही टूर प्रायोजित केली जात आहे.
BookMyShow Live आणि BookMyShow चा प्रायोगिक विभागाद्वारे ट्रेवर नोहचे भारत दौऱ्यातील सात कार्यक्रम सादर केले जातील. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे कार्यक्रम खालील वेळापत्रकानुसार सादर होतील.
- 22 ते 24 सप्टेंबर- दिल्ली-NCR मधील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम
- 27 ते 28 सप्टेंबर- बंगळुरु येथील मॅन्फो कन्व्हेन्शन सेंट
- 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2023- मुंबई- NSCI डोम
ऑफ द रेकॉर्ड टूर कार्यक्रमाचे तिकीट कसे बुक कराल?
कोटक क्रेडिट कार्ड धारकांसाठी तिकिटांची प्रीसेल 1 ऑगस्ट 2023 पासून सुरु होईल. BookMyShow प्लॅटफॉर्मवर IST संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. कोटक व्हाईट किंवा कोटक व्हाईट रिझर्व्ह क्रेडिट कार्डधारक मर्यादित जागांसाठी विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकतात. 3 ऑगस्ट 2023 पासून BookMyShow वर IST संध्याकाळी 6 वाजता सामान्य तिकीट विक्री सुरू होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)