'Barbie' सिनेमा वर Kuwait मध्ये बंदी; 'समलैंगिकतेला प्रोत्साहन' देत असल्याच्या कारणावरून Lebanon मध्येही अडचणीत

जगभरातील बॉक्स ऑफिसवर USD 1 बिलियन पेक्षा जास्त कमाई करणारा एका महिला दिग्दर्शकाचा हा पहिला सिनेमा आहे.

Barbie । Insta

Greta Gerwig यांच्या 'Barbie' सिनेमाची क्रेझ जगभर आहे. पण त्यासोबतच वादाची मालिका देखील सुरू आहे. The Hollywood Reporter च्या माहितीनुसार, आता Vietnam पाठोपाठ Kuwait मध्येही 'बार्बी' सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. लोकल रिपोर्ट्सनुसार, Lafi Al-Subaie या chairman of the film censorship committee कडून "समाजात अयोग्य मूल्यांचा, चूकीच्या वागणूकीचा प्रसार होणार्‍या काही गोष्टींचा समावेश" असल्याचं कारण समोर करण्यात आलं आहे.

'Barbie' सिनेमा Lebanon मध्येही बॅन होण्याच्या मार्गावर आहे. culture minister Mohammad Mortada यांनी या सिनेमा समलैंगिकतेला प्रोत्साहन देत असल्याचा म्हणाला आहे. कौटुंबिक घटकाचे महत्त्व कमी करून "विश्वास आणि नैतिकतेच्या मूल्यांचा विरोधाभास आहे," असे हॉलीवूड रिपोर्टरने म्हटले आहे.

'Barbie' सिनेमामध्ये Margot Robbie आणि Ryan Gosling प्रमुख भूमिकेत आहेत. 21 जुलैला हा सिनेमा रिलीज झाला आहे. बॉक्सऑफिसवर त्याचा मुकाबला Christopher Nolan च्या 'Oppenheimer'सोबत झाला. मिश्र प्रतिसाद असला तरीही 'बार्बी' 2023 चा highest-grossing सिनेमा ठरला आहे.

विशेष म्हणजे, 'बार्बी' आणि दिग्दर्शिका ग्रेटा यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी इतिहास रचला, जगभरातील बॉक्स ऑफिसवर USD 1 बिलियन पेक्षा जास्त कमाई केली, आणि केवळ एका महिलेने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट ठरला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif