95th Academy Awards: अभिमानस्पद! 21 वर्षांनंतर ऑस्करच्या शर्यतीत भारतीय चित्रपट; Chhello Show आणि RRR झाले शॉर्टलिस्टेड

त्यानंतर नॉमिनेशन लिस्ट 24 जानेवारीला जाहीर केली जाईल. हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 12 मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

Chhello Show (Photo Credits: YouTube)

चित्रपटसृष्टीमधील सर्वात प्रतिष्ठित समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार  (Oscars 2023) येऊ घातले आहेत. नुकतेच पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यामधील शोर्टलिस्टेड सिनेमांची यादी समोर आली आहे. ऑस्कर 2022 साठी दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली आहे व खचितच ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'सह (RRR) गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' (Chhello Show) म्हणजेच 'लास्ट फिल्म शो'चा समावेश आहे.

आपल्या चित्रपटाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राजामौली यांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाने रिलीज होताच देश-विदेशात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. तो ऑस्करच्या 'सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म' श्रेणीत नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, पण काही कारणास्तव तो निवडला गेला नाही. यानंतर, निर्मात्यांनी चित्रपटासंदर्भात मोहीम सुरू केली आणि आरआरआर स्वतंत्रपणे ऑस्करच्या श्रेणींमध्ये नामांकनासाठी सादर केला गेला.

आता अखेर आरआरआरची 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. बुधवारी 10 ऑस्कर श्रेणींसाठी शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली. यामध्ये माहितीपट आणि आंतरराष्ट्रीय फिचर चित्रपट, डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट आणि ओरीजनल स्कोअर यांचा समावेश आहे. आनंदाची बातमी म्हणजे भारताची अधिकृत प्रवेशिका, ‘छेल्लो शो' हा ऑस्करसाठी 'आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आरआरआरमधील 'नाटू नाटू' या गाण्याच्या संगीताचा समावेश ओरीजनल स्कोअरमध्ये करण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये निवडलेल्या इतर चित्रपटांमध्ये अर्जेंटिना 1985, द क्वाएट गर्ल आणि द ब्लू काफ्तान यांचा समावेश आहे. यावेळी ऑस्करमध्ये आणखी एक खास गोष्ट म्हणजे, अकादमी अवॉर्ड्समध्ये पाकिस्तानमधील चित्रपटाला प्रवेश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानी चित्रपट 'जॉयलँड'चाही 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा: एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचे यश; यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट 50 जागतिक चित्रपटामध्ये मिळाले स्थान)

आता ऑस्कर पुरस्कारांच्या विविध श्रेणींसाठी 12 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत मतदान होणार आहे. त्यानंतर नॉमिनेशन लिस्ट 24 जानेवारीला जाहीर केली जाईल. हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 12 मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif