हसून हसून दुखेल पोट! Chala Hawa Yeu Dya च्या मंचावर दिसणार The Kapil Sharma Show मधील कलाकार

मात्र, असे असतानाही झी मराठीचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत.

Chala Hawa Yeu Dya (Photo Credit: Instagram)

कोरोनामुळे प्रत्येकजण ताणतणावात जगत आहे. मात्र, असे असतानाही झी मराठीचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. या कार्यक्रमातील विनोदी कलाकार अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरले आहे. या कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. तसेच वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोक हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकार नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांना खळखळून हसायला लावतात. आता याच मंचावर झी टीव्ही वाहिनीवरील झी कॉमेडी फॅक्टरी (Zee Comedy Factory) या आगामी कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, अली अजगर, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश या कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. या विनोदी वीरांनी एकत्र येऊन चला हवा येऊ द्या च्या मंचावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. हे देखील वाचा- Priya Ahuja : ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी कॉमेडी फॅक्टरीचा पहिला प्रीमिअर शो येत्या 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमात कोरियोग्राफर आणि फिल्मफेकर फराह खान, अली असगर, सुगंधा मिश्रा, डॉ. संकेत भोसले, पुनीत जे. पाठक, आदित्य नारायण, तेजस्वी प्रकाश, गौरव दुबे, बलराज, सिद्धार्थ सागर, चित्रांशी रावत, दिव्यंश द्विवेदी यांच्यासह देशातील विविध कलाकार झळकणार आहेत.