Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळीची एन्ट्री; लुडोवर डान्समध्ये सदस्यांनी केली धमाल-मस्ती (Watch Video)

ज्यात फुलवंती चित्रपटाचे कलाकार अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) बिग बॉसच्या घरात सदस्यांना भेटायला आले असल्याचे दिसत आहेत.

Photo Credit- X

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसचा (Bigg Boss Marathi 5) नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात फुलवंती चित्रपटाचे कलाकार बिग बॉसच्या घरात सदस्यांना भेटायला आले असल्याचे दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) सदस्यांसोबत मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. नवा ट्विस्ट नवा खेळ घेऊन दोन्ही कलाकार बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. ज्यात ते सर्व स्पर्धकांना लूडोवर आलेल्या डान्स स्टाईवर नाचवणार आहेत. या एपिसोडचे होस्टिंग निलेश साबळे करत आहेत. 'भाषेच्या तालावर' असे खेळाचे नाव असून सर्व स्पर्धक खेळात मजामस्ती करताना दिसत आहेत.

'भाषेच्या तालावर' खेळात सदस्यांना लुडो फेकायचा आहे. त्यानंतर जी डान्स स्टाइल येणार त्यावर भन्नाट डान्स करायचा आहे. यात अभिजीत सावंत लुडो फेकतात. त्यांना हिपहॉप डान्स स्टाइल येतो. "मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए" या गाण्यावर अभिजीत सावंत डान्स करतात. त्यांना गश्मीर महाजनी साथ देतात. दोघांच्या तुफान डान्सने सरवच स्पर्धक आकर्षित होताना पहायला मिळतात. त्यानंतर सूरज देखील डान्स करताना प्रोमोमध्ये दिसत आहे.

शेवटी निक्की या व्हिडीओत दिसते. "पाहुणा आला का..." म्हणतं गश्मीर महाजनीवर बाण सोजते. त्या निशाण्यावर गश्मीर महाजनी घायाळ घायाळ होताना दिसतो. तिच्या अदांनी सर्वांच्याच बूवया उंचावतात.(हेही वाचा: Bigg Boss Marathi: आईकडून अरबाजबद्दल ऐकून निक्कीला आला राग; फेकून दिलं सर्व सामान)

बिग बॉसच्या घरात गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळीची एन्ट्री

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नुकताच गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये पाहायला मिळाला होता. तसेच प्राजक्ता नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि सोंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. या आठवड्यात कोण बिग बॉसच्या शर्यतीमधून बाहेर पडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif