IPL Auction 2025 Live

बॉईज नंतर आता कहर करायला येत आहेत 'गर्ल्स', बोल्ड मराठी चित्रपटांच्या यादीत नव्या नावाची भरती

सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज. मुलींचा बोल्ड अंदाज चर्चेचा विषय.

Girls Movie Poster | (Picture credit: Instagram)

मुलांच्या आयुष्यावर जरा हटके नजर टाकणाऱ्या 'बॉईज '(Boyz) आणि 'बॉईज २ '(Boyz 2) च्या यशानंतर, आता मुलींच्या भावविश्वाचं दर्शन घडवणारा 'गर्ल्स' हा चित्रपट येतो आहे. नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर (Vishal Devrukhkar) यांनी पोस्टरचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेयर केला. बॉईजच्या दोन्ही भागांच दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलं होतं. या वर्षाच्या सुरवातीला आलेल्या 'स्रीलिंग पुल्लिंग' नंतर तरुण मुलींच्या आयुष्यावर आधारित असा हा बोल्ड सिनेमा असणार आहे.

'मुलींची लहर, केला कहर ' अशी टॅगलाईन असलेल्या ह्या पोस्टर मधला मुलींचा बोल्ड लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बॉईजच्या दोन्ही भागांप्रमाणेच हा चित्रपट सुद्धा तरुणाईला आकर्षित करेल अशी आशा आहे. 'प्रौढ विनोदी' सिनेमांच्या यादीत हि नवी एन्ट्री म्हणता येईल. या आधी आलेले 'बॉईज 'चे दोन्ही भाग तसेच, याच वर्षी येऊन गेलॆला 'टकाटक '(Takatak) या सिनेमांच्या यशानंतर मराठी चित्रपटसृष्टीच्या ह्या नव्या ट्रेंडचा फायदा या सिनेमालाही होईल, असे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

मजा-मस्ती करणे फक्त मुलांचं काम नसतं. घेऊन आलो आहोत गर्ल्स, आता फक्त मुलींचाच राडा! #girlzthemovies #girlz #29november

A post shared by Vishal Devrukhkar (@devrukhkar.vishal) on

 

या चित्रपटाचे लेखन विशाल देवरुखकर आणि हृषीकेश कोळी यांनी केले आहे. तर, एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रीएशन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 29 नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होत आहे.