हाऊसफुल्ल-4 च्या सेटवर ज्युनिअर आर्टिस्टसोबत अश्लील वर्तवणूक
फोटो सौजन्य- ANI

मी टू प्रकरणातील घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार या प्रकरणी अडकले गेले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी हाऊसफुल्ल-4 या चित्रपटाचे शूट थांबले होते. परंतु पुन्हा एकदा या चित्रपटाचे शूट चालू झाले असून त्याच्या सेटवर एका एका ज्युनिअर आर्स्टिटसोबत अश्लील वर्तवणूक झाल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी रात्री हाऊसफुल्ल-4 या चित्रपटातील एका गाण्याचे शूट चालू होते. त्यावेळी काही अज्ञात सहा जणांनी तेथे जाऊन सेटवरील ज्युनिअर आर्स्टिस्टसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र या पीडित महिलेने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न ही केला. तरीही या सहा आरोपींनी या पीडित महिलेचा विनयभंग केला आहे.

तसेच या घटनेप्रकरणी सेटवरील डान्सरनी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. तर पवन शेट्टी आणि सागर शेट्टी अश्या दोन आरोपींची नावे पुढे आली आहेत.