IPL Auction 2025 Live

नागपूर: पद्मश्री काय गल्लीतल्या कोणालाही मिळतो, महाकवी सुधाकर गायधनी यांचे वादग्रस्त विधान

तब्बल 46 वर्षानंतर या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली यावेळी महाकवी सुधाकर गायधनी साहित्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ आणि भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक म्हणजेच पद्मश्री वर टीका केली आहे.

Sudhakar Gaidhani (Photo Credits: Facebook)

नागपुर (Nagpur) मध्ये अलीकडेच ‘कब्रीतला समाधिस्थ’ या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. तब्बल 46 वर्षानंतर या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली असल्याने हा सोहळा खास होता. पण यावेळी कार्यक्रमाच्या ऐवजी महाकवी सुधाकर गायधनी (Sudhakar Gaidhani) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लोकसत्ता दैनिकाच्या वृत्तानुसार, या सोहळ्यात गायधनी यांनी साहित्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ (DnyanPith) आणि भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक म्हणजेच पद्मश्री (Padmashree) वर टीका केली आहे. National Film Awards 2019: 'भोंगा' राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित

 सुधाकर गायधनी यांनी बोलताना “ज्ञानपीठाचे पीठ खराब झाले आहे, त्यात अळ्या झाल्या आहेत. भालचंद्र नेमाडेंच्या सुमार कादंबरीला तो मिळतो”, असं म्हटलं आहे. इतक्यावरच न थांबता, त्यांनी पुढे पद्मश्री गल्लीतल्या कोणालाही मिळतो असंही म्हटलं आहे. “पद्मश्री गल्लीतल्या कुणालाही मिळतो. मलाही विचारणा झाली होती, पण मी पद्मभूषण मागितले”, असा दावा गायधनी यांनी केला आहे.याशिवाय “अनेकजण स्वतःला नामवंत कवी समजतात, पण कविता काय असते हे त्यांनाही कळत नाही. ती कविता विस्मृतीत जाते आणि कवी स्वर्गात जातो”, असंही ते म्हणाले आहेत.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गायधनी यांना जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाने अखील भारतीय दलुभाऊ जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. जळगाव येथे 18ऑगस्टला होणाऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय पंधराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. 21  हजार रुपयांचा धनादेश आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.