Dhoom Again सिनेमातून माजी क्रिकेटर श्रीसंत करणार रुपेरी पडद्यावर धम्माल, सोशल मीडियावर शेअर केले फोटो (See Photos)
श्रीसंत हा Dhoom Again या साऊथ इंडियन सिनेमातून रुपेरी पडद्यावर धमाल करताना पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील श्रीसंतचा लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्ययात आला होता, हा फोटो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर एस. श्रीसंत (S. Shreesanth) याच्यावर 2013 मध्ये मॅच फिक्सिंगचा (Match Fixing) आरोप लावल्यानंतर क्रिकेट विश्वातून एकाएकी बाजूला झाला होता, मध्यंतरी मंदिरात पूजा करताना तर कधी फॅमिली सोबतच्या फोटोतुन त्याचा सोशल मीडियाशी संपर्क होता. पण बिग बॉसच्या (Bigg BOss) सीझन मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यावर तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आला. या सीझन मध्ये त्याला विजय मिळाला नसला तरी रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून काम करण्याच्या अनेक ऑफर्स त्याच्याकडे येऊ लागल्या. प्राप्त माहितीनुसार सध्या तो 'Kempegowda 2' या साऊथ इंडियन सिनेमाचे चित्रीकरण करत आहे तर या पाठोपाठ लगेचच त्याला धूम अगेन (Dhoom Again) या सिनेमासाठी देखील त्याचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
अलीकडेच धूम अगेन या सिनेमातील श्रीसंतचा लूक सुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. धूम अगेन च्या पोस्टर मध्ये श्रीसंत सोबतच स्पॅनिश मॉडल जनेरा इधर (Janera Idher) हिचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे .राजेश वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा धूम अगेन हा एक बिग बजेट सिनेमा असून हिंदी, मल्याळम, कन्नडा, तामीळ व तेलगू भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील दोषी क्रिकेटर श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; आजीवन बंदीबद्दल पुर्नविचार करण्याचा BCCI ला आदेश
पहा धूम अगेन मधील श्रीसंतची झलक
दरम्यान, दिग्दर्शक राजेश वर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाचे चित्रीकरण ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असून हिंदीतील धूम सीरिजशी याचा काहीही संबंध नाही. तसेच, सुरुवातीला ही फिल्म केवळ कन्नड मध्ये प्रदर्शित करण्याचे ठरवले होते, मात्र चाहत्यांचा उत्साह पाहता आता अन्य भाषांमध्ये सुद्धा धूम अगेन पाहता येणार आहे.