दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत घडला 'हा' जीवघेणा प्रसंग

दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत आज एक जीवघेणी घटना घडली आहे. लिफ्ट अचानक बंद पडल्याने आतमध्ये अडकून पडण्याची जीवघेणी घटना ठाणे शहरातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विजू माने यांच्यासोबाबत घडली.

Viju Mane (Photo Credits: Facebook)

दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत आज एक जीवघेणी घटना घडली आहे. लिफ्ट अचानक बंद पडल्याने आतमध्ये अडकून पडण्याची जीवघेणी घटना ठाणे शहरातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विजू माने यांच्यासोबाबत घडली. त्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत, सर्व नाट्यप्रेमींना या घटनेबद्दलची माहिती दिली आहे.

विजू माने हे आज एका कार्यक्रमानिमित्त काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गेले होते. परंतु, व्हिआयपी लिफ्टमधून कार्यक्रम स्थळी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली आणि ते अर्ध्यावरच अडकले. बाहेर निघण्याचा अथक प्रयत्न करूनही त्यांना ते शक्य झाले नाही. आणि अखेरीस नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मींनी घटनास्थळी पोहोचून विजू माने यांना लिफ्टमधून बाहेर काढले आहे.

या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता, अनेक सिनेकलाकारांनी विजू माने यांच्या पोस्टवर नाट्यगृहांच्या दुरावस्थेविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पानिपत चित्रपट प्रदर्शित करू नये, शिंदे सरकारकडून याचिका दाखल; 2 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडणार सुनावणी

दरम्यान, या आधी अभिनेते सुमित राघवन यांनी देखील ठाण्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेविषयी आवाज उठवला होता. त्याचसोबत अनेक मराठी कलाकारांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले या नाट्यगृहाची असलेली बिकट परिस्थिती व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपुढे मंडळी होती. परंतु प्रशासन या सर्व बाबींकडे कधी गांभीर्याने घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now