चित्रपटसृष्टीमधील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला 'पियानो फॉर सेल' या मराठी नाटकाचा ग्रँँड प्रीमियर

लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित 'पियानो फॉर सेल' या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग 1 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन आहे.

चित्रपटसृष्टीमधील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला 'पियानो फॉर सेल' या मराठी नाटकाचा ग्रँँड प्रीमियर
वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे

'पियानो फॉर सेल' या दोन पात्री नाटकाचा प्रीमियर 30 नोव्हेंबर 2018 रोजी, दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये पार पडला. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मराठी चित्रपटसृष्टीमधील तसेच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. उषा मंगेशकर, मीना खाडीकर, शिवाजी साटम, किरण शांताराम, अनुप जलोटा, दिपक बलराज विज, गश्मीर महाजनी, अनुराधा राजाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

पियानो फॉर सेल या नाटकासाठी दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच एकत्र आल्या आहेत, त्यामुळे रसिक प्रेक्षकांना हा अनुभव प्रचंड आनंददायी ठरणार आहे. हा अनुभव रंगभुमीवरचा असल्याने तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरत आहे. या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाचा आशय आणि सादरीकरण 'पियानो फॉर सेल'ला एका अतुलनीय उंचीवर घेऊन गेले आहेत. प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिज़िटल डिटॉक्स निर्मिती संस्था - यांच्या 'पियानो फॉर सेल' या नाटकाद्वारे, एक वेगळा अतुलनीय अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने ज्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभुमीवर एकत्र आल्या आहेत त्या म्हणजे - वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज.

लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित 'पियानो फॉर सेल' या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग 1 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2018 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).