Pushpa Bhave Passes Away: नाट्य समीक्षेतील तारा निखळला; विचारवंत, प्रभावी वक्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

पुष्पा भावे या प्रभावी वक्त्या आणि परखड नाट्य समीक्षक होत्याच. परंतू, सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा त्याच्या मांडणीसाठी सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्या त्या समाजवादी विचारांच्या नेत्या होत्या. समाजवादी विचार आणि विचारांशी सुसंगत कृती हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट होते.

Pushpa Bhave | (Photo Credits-YouTube)

आपल्या अमोघ वक्तृत्वाने समोरच्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रभावी वक्त्या, ज्येष्ठ नाट्य समीक्षक (Drama Critic) प्रा. पुष्पा भावे यांचे निधन (Pushpa Bhave Passes Away) झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. राष्ट्र सेवा दल (Rashtra Seva Dal) सक्रीय नेत्या आणि पुरोगामी विचारवंत अशी त्यांची ख्याती होती. शनिवारी (3 ऑक्टोबर 2020) मध्यरात्री 12.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रा. भावे (Pushpa Bhave) या प्रदीर्घ काळापासून प्रकती अस्वास्थ्याने त्रस्त होत्या. त्यांच्यावर शिवाजीपार्क स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबई येथील रुईया महाविद्यालयात प्रा. पुष्पा भावे यांनी प्रदीर्घ काळ नोकरी केली. याच ठिकाणी त्या प्राध्यापिका सेवानिवृत्त झाल्या. नाट्य समिक्षेमध्ये त्यांनी भरीव काम केले. त्यासोबतच संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, दलित पँथर, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्येही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला. त्या खंबीर स्त्रीवादी कार्यकर्त्याही होत्या. त्यांच्या निधानाने स्त्रीवादी चळवळीचा, शोषितांचा आवाज थंडावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, मराठीतील वादग्रस्त नाटके; ज्यांनी रंगभूमी ढवळून टाकली)

प्रा. पुष्पा भावे या प्रभावी वक्त्या आणि परखड नाट्य समीक्षक होत्याच. परंतू, सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा त्याच्या मांडणीसाठी सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्या त्या समाजवादी विचारांच्या नेत्या होत्या. समाजवादी विचार आणि विचारांशी सुसंगत कृती हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट होते. (हेही वाचा, Memories of Ghashiram Kotwal Natak: शरद पवार, घाशीराम कोतवाल आणि बर्लिन नाट्य महोत्सव, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी सांगितली आठवण)

अध्यापनाच्या क्षेत्रात असल्या तरी केवळ अध्यापनापुरते मर्यादीत न राहता प्रा. पुष्पा भावे यांनी समाजराकरणाशी नाळ जोडली. अर्थात ती नाळ सुरुवातीपासूनच होती. राष्ट्र सेवा दल, लोकशाहीवादी चळवळ आदींंशी त्यांचा संपर्क विद्यार्थीदशेत असतानापासूनचा आहे. हाच संपर्क पुढे अधिक व्यापक झाला. त्या समाजकारणातही आल्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा प्रमुख आंदोलनांमध्ये त्यांचा आवाज प्रामुख्याने उठावदार राहिला.

प्रा. पुष्पा भावे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ

आपल्या सडेतोड भुमिकेसाठी प्रा. पुष्पा भावे नेहमीच चर्चेत राहात असत. अखिल भारतीय साहित्य संमेलन 2013 मध्ये एका व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा मुद्दा आला. तेव्हा त्याला पुष्पाताईंनी तीव्र विरोध दर्शवला. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा साहित्यिक आणि लेखकांचा अपमान केला असे सांगत त्यांनी हा विरोध दर्शवला होता.

नाट्य क्षेत्रात पुष्पा भावे यांच्या समीक्षेची मोठी उत्सुकता असे. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांनाही त्यांच्या लिखाणावर प्रा. पुष्पा भावे यांची काय मत आहे याबाबत उत्सुकता असे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif