Actor Kishore Nandlaskar Passes Away: अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे निधन
त्यांनी गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचा वावर होता. मराठी आणि हिंदी अशा साधारण 50 किंवा त्याहून अधिक चित्रपटांतून काम केले.
अभिनेता किशोर नांदलस्कर (Kishore Nandlaskar Passes Away) यांचे निधन झाले आहे. ठाणे (Thane) येथील एका रुग्णालयात त्यांनी आज (20 एप्रिल) दुपारी 12.30 च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवसांपासून किशोर नांदलस्कर (Kishore Nandlaskar) हे प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होते. दमल लागणे, छातीत धडधडणे अशा प्रकारचे काही शारीरीक त्रास त्यांना होत असत. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना बायपास करण्याचा सल्ला दिला होता. त्यांची बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणीही पॉजिटीव्ह आल्याचे बोलले जात आहे.
किशोर नांदलस्कर हे मराठी आणि हिदीं अभिनय सृष्टीतील सर्वपरीचीत अभिनेते होते. त्यांनी गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचा वावर होता. मराठी आणि हिंदी अशा साधारण 50 किंवा त्याहून अधिक चित्रपटांतून काम केले. याशिवाय जवळपास 40 पेक्षाही अधिक नाटकांमध्येही अभिनय केला होता. (हेही वाचा, Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन)
किशोर नांदलस्कर यांची गाजलेली नाटके
- चल आटप लवकर
- भ्रमाचा भोपळा
- पाहुणा
- श्रीमान श्रीमती
- भोळे डॅम्बीस
- वन रूम किचन
किशोर नांदलस्कर यांचे गाजलेले चित्रपट
- सारे सज्जन
- शेजारी शेजारी
- हळद रुसली कुंकू हसले
- वास्तव
- जिस देश में गंगा रहता है
- तेरा मेरा साथ है
- खाकी
- जान जाए पर वचन न जाए
- ये तेरा घर ये मेरा घर
- हलचल
- सिंघम
‘नाना करते प्यार’ या मराठी नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे त्यांचे शेवटचे नाटक. या नाटकासोबतच त्यांनी आयुष्याच्या पडद्यावरुही एक्झिट घेतली. या नाटकात त्यांनी ‘राजा’ची भूमिका साकारली होती. शिवाय ‘वासूची सासू’ या नव्याने सादर करण्यात आलेल्या नाटकातही त्यांनी विशेष भूमिका साकारली होती.