क्रिती सॅनॉन आणि काजोलचा 'दो पत्ती' पायरसीचा बळी; Tamilrockers, Movierulz आणि Telegram Channel वर चित्रपट लीक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिती सॅनन, काजोल आणि शाहीर शेख यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘दो पत्ती’ चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक चतुर्वेदी यांनी केले आहे.

क्रिती सॅनॉन आणि काजोलचा 'दो पत्ती' पायरसीचा बळी; Tamilrockers, Movierulz आणि Telegram Channel वर चित्रपट लीक
Photo Credit- X

Do Patti Full Movie Leaked: दो पट्टी हा शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित नुकताच प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचा प्रीमियर आज 25 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर आला. या चित्रपटात तन्वी आझमी, ब्रिजेंद्र काला आणि प्राची शाह पांड्या यांच्यासह क्रिती सेनॉन, काजोल आणि शाहीर शेख प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र, दुर्दैवाने चित्रपट पायरसीला बळी पडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपट, HD फॉरमॅटमध्ये MovieRulz, Tamilrockers, 1337x आणि Telegram चॅनेल सारख्या टोरेंट साइट्सवर बेकायदेशीरपणे लीक झाला आहे.

मोफत पाहण्यासाठी चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जवळपास प्रत्येक चित्रपट पायरसीला बळी पडतो. यापूर्वी या साइट्सवर अनेक कठोर कारवाई आणि निर्बंध घालण्यात आले होते. परंतु ब्लॉक केल्यानंतरही या साइट्स चाचेगिरीला प्रोत्साहन देत आहेत. यावर सायबर सेलने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. (Bigg Boss Kannada 11: बिग बॉसच्या इतिहासामध्ये प्रथमच सामान्य प्रेक्षकांचा घरात प्रवेश; थेट स्पर्धकांशी होणार भेट (Watch video)).

क्रिती सॅनॉन आणि काजोलचा 'दो पत्ती' पायरसीचा बळी

चित्रपटात क्रिती सेनॉन डबल रोल करताना दिसत आहे. दोन बहिणींचा भूमीका ती साकारते. त्यात लव ट्रेंगल आहे. चित्रपटाती राझंन गामे सध्या अनेकांच्या ओठावर आहे. गाणे खूपच चर्चेत आहे. तर काजोल पोलिसाच्या भूमीकेत आहे, चित्रपटाला अनेकांनी चांगले रिव्ह्यूव दिले आहेत. चित्रपटाची कथाही चांगील आहे. कलाकारांनी चांगली कला देखील सदर केली आहे. आता प्रेक्षक चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात ते पहावं लागेल.

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2024 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).