Disney+ to Stop Password Sharing Facility: डिस्ने+ यूजर्सना बसणार झटका; पासवर्ड शेअरिंग सुविधेवर जून महिन्यापासून येणार पूर्णपणे बंदी, जाणून घ्या सविस्तर
डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी उघड केले की, कंपनी जून 2024 पासून पासवर्ड शेअरिंग सुविधेवर बंदी घालण्यास सुरुवात करणार आहे. हे पाऊल डिस्नेच्या स्ट्रीमिंग कमाईला चालना देण्यासाठी आणि नफा मिळवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने आहे.
डिस्ने+ (Disney+) वापरकर्त्यांना लवकरच मोठा झटका बसणार आहे. कंपनीने पासवर्ड शेअरिंगवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी केली आहे. नेटफ्लिक्स (Netflix) नंतर आता डिस्ने + स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना पासवर्ड शेअर करण्यापासून रोखण्यासाठी नवीन धोरण सादर करणार आहे. कंपनीने आधीच सांगितले आहे की, नवीन धोरण वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड शेअर करण्यापासून प्रतिबंधित करेल, परंतु ही प्रक्रिया कधी सुरू होईल हे कंपनीने सांगितले नव्हते. आता कंपनीने याचा खुलासा केला आहे.
अहवालानुसार, CNBC ला दिलेल्या मुलाखतीत डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी उघड केले की, कंपनी जून 2024 पासून पासवर्ड शेअरिंग सुविधेवर बंदी घालण्यास सुरुवात करणार आहे.
बॉब इगर यांनी सांगितले की, हे पाऊल डिस्नेच्या स्ट्रीमिंग कमाईला चालना देण्यासाठी आणि नफा मिळवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने आहे. इगरने डिस्नेच्या नफ्याच्या उद्दिष्टांमध्ये स्ट्रीमिंगच्या महत्त्वाच्या भूमिकेवर जोर दिला. हा नफा सध्या करण्यासाठी पासवर्ड शेअर करण्याची सुविधा काढून टाकणे ही एक प्रमुख रणनीती मानली जाते. यासाठी सप्टेंबरपर्यंत जागतिक स्तरावर विस्तार करण्यापूर्वी कंपनी विशिष्ट देशांना लक्ष्य करून, जूनमध्ये आपला पायलट उपक्रम सुरू करणार आहे.
याबाबत इगरने मुलाखतीत सांगितले की, 'जूनमध्ये आम्ही पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा आमचा पहिला खरा प्रयत्न सुरू करू. सध्या फक्त काही देशांमध्ये आणि काही बाजारपेठांमध्ये ते सुरु होईल, परंतु सप्टेंबरमध्ये ते पूर्ण रोलआउट होईल. रिपोर्टनुसार, पासवर्ड शेअरिंग थांबवण्यासोबतच कंपनी लवकरच यूजर्ससाठी काही नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन आणणार आहे. स्ट्रीमिंग प्रतिस्पर्धी नेटफ्लिक्सच्या पासवर्ड शेअरिंगच्या क्रॅकडाउनमुळे त्यांना 2023 च्या उत्तरार्धात सुमारे 22 दशलक्ष सदस्य जोडण्यात मदत झाली. हे निकाल पाहून आता डिस्ने पासवर्ड शेअरिंगवरही कडक कारवाई करणार आहे. (हेही वाचा: High-Risk Warning For Apple Users: तुम्हीही ॲपलची उत्पादने वापरत असाल तर व्हा सावध! केंद्राने iPhone, iPad आणि MacBook वापरकर्त्यांसाठी जारी केली 'हाय रिस्क वॉर्निंग')
दरम्यान, आपल्या एकत्रित स्ट्रीमिंग सेवेच्या (Combined Streaming Service) सदस्यत्वांना चालना देण्यासाठी, डिस्नेने अलीकडेच एकत्रित Disney+ आणि Hulu ॲप लाँच केले. हे नवीन प्लॅटफॉर्म दोन्ही सेवांमधील सर्व कंटेंट एकाच ठिकाणी आणते,
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)