Bharat Ganeshpure यांना मातृशोक, मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे वृद्धापकाळाने निधन

आज भारत गणेशपुरे यांच्या आईचे निधन झाले आहे. भारत यांच्या आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे गणेशपुरे यांच्या अमरावती येथील घरी आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

Bharat Ganeshpure यांना मातृशोक, मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे वृद्धापकाळाने निधन
Bharat Ganeshpure

मराठी मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी आली आहे. मराठीतल्या एका विनोदी कलाकाराला आज मात्र रडावं लागलं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे भारत गणेशपुरे. भारत गेली अनेक वर्षे 'झी' मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. भारत गणेशपुरे यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज भारत गणेशपुरे यांच्या आईचे निधन झाले आहे. भारत यांच्या आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे गणेशपुरे यांच्या अमरावती येथील घरी आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. हेही वाचा Abhishek Bachchan-Anupam Kher Emotional Video: सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर यांना धीर देताना दिसला अभिषेक बच्चन; भावनिक व्हिडीओ व्हायरल (Watch)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. भारत यांचे बंधु मनीष यांच्या राहत्या घरातून रहाटगाव स्मशानभूमीकरता संध्याकाळी 5 च्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारत गणेशपूरेंवर मात्र आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विनोदी शो बरोबरच त्यांनी अनेक चित्रपटांतून विनोदी तसेच गंभीर भूमिका केल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 09, 2023 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).