Coldplay Concert Mumbai Tickets Row: 'BookMyShow' कडून तिकीटांच्या ब्लॅक मार्केटिंग प्रकरणी FIR दाखल; कॉन्सर्ट रद्द होण्याच्या वृत्तांना फेटाळलं

कोल्ड प्ले ची तिकीटं मोठ्या रक्कमेमध्ये नंतर विकली गेल्याने सध्या बूक माय शो मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing च्या रडार वर आले आहे.

BookMyShow (Photo Credits: BookMyShow Twitter)

Coldplay Concert च्या मुंबई मधील कॉन्सर्टच्या तिकीट विक्री मध्ये 'गडबड' झाल्या वरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता BookMyShow कडून मध्ये एका अनोळखी व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिकीटांचं ब्लॅक मार्केटिंग झाल्याचे यामध्ये दावे करण्यात आले आहेत. विलेपार्ले पोलिसांनी IT Act अंतर्गत section 66 (C) आणि BNS Act अंतर्गत अन्य कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कोल्ड प्ले ची कॉन्सर्ट जानेवारी 2025 मध्ये नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम वर होणार आहे.

बूक माय शो कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, 22 सप्टेंबरला त्यांनी कोल्ड प्ले मुंबईची तिकीट विक्री सुरू केली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे कोणत्याही थर्ड पार्टी साईट कडून तिकीट खरेदी करू नये असे नमूद केले होते. आता तक्रारी मध्ये बूक माय शो कडून तिकीटं अवैध पणे पुन्हा कोणी विकली याचा तपास पोलिसांनी करावा असं आवाहन केले आहे.

कोल्ड प्ले ची तिकीटं मोठ्या रक्कमेमध्ये नंतर विकली गेल्याने सध्या बूक माय शो मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing च्या रडार वर आले आहे. Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल .

कोल्ड प्ले हा ब्रिटीश बॅन्ड “Music of the Spheres World Tour 2025” घेऊन भारतात नवी मुंबई मध्ये 18,19 आणि 21 जानेवारी 2025 ला कॉन्सर्ट करणार आहे. दरम्यान तिकीट विक्री वादाच्या भोवर्‍यात असल्याने आता ही कॉन्सर्ट रद्द होणार का? अशी चर्चा असताना बूक माय शो कडून ही वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. भारतामध्ये कोल्ड प्ले ची आयोजित टूर ठरलेल्या प्लॅन नुसार होणार असल्याचं म्हटलं आहे.

BookMyShow कडून सध्या सार्‍या रिसेलर्सची माहिती देण्यात आली आहे. वैयक्तिक जे कोणी सोशल मीडीयाच्या माध्यमातून तिकीट रिसेलिंग करत असल्याचं दिसत आहे त्यांचीही माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.