Chiranjeevi Enters Guinness World Record: मेगास्टार चिरंजीवी यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, 45 वर्षांच्या कारकिर्दीत 156 चित्रपट, 537 गाणी, 24 हजार डान्स स्टेप्स

हा सन्मान त्यांना बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते मिळाला. चिरंजीवी यांनी त्यांच्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत 156 चित्रपट, 537 गाणी केल्याने हा सन्मान देण्यात आला आहे.

Photo Credit- X

Chiranjeevi Enters Guinness World Record: साऊथ चित्रपट सृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi)यांच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे. चिरंजीवी यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद(Guinness World Record) झाली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी स्टार या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan)चिरंजीवी यांना हा पुरस्कार दिला आहे. (हेही वाचा: David Warner In Pushpa2 : अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मध्ये डेव्हिड वॉर्नरची एन्ट्री? लीक झालेल्या फोटोंमुळे चर्चा)

156 चित्रपट, 537 गाणी

मेगास्टार चिरंजीवी यांनी त्यांच्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत 156 चित्रपटांत काम केले आहे. त्याशिवाय, 537 गाण्यांमध्ये 24,000 हून अधिक डान्स मूव्ह्ज केले आहेत. 1978 मध्ये चिरंजीवी यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

चिरंजीवी यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होताच सून उपासना कोनिडेला यांनी सोशल मिडीयावर त्यांना शुभेच्छा दिल्या, “45 वर्षांत 156 चित्रपट आणि 24,000 हून अधिक नृत्य आणि 537 गाण्यांसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल मेगास्टार चिरंजीवी गरु यांना धन्यवाद!” असे सून उपासना हिने सोशल मिडीयावर लिहिले आहे.

चिरंजीवी यांच्याबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला की, 'येथे येणे माझ्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. चिरंजीवी गरुंचे चाहते पाहून मला आनंद झाला. मी चिरंजीवी यांचा मोठा चाहता आहे. मला इथे बोलावल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो.' वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर चिरंजीवी शेवटचे 2023 च्या भोला शंकर चित्रपटात दिसले होते. त्याचा विश्वंभरा नावाचा कल्पनिक ॲक्शन चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

चिरंजीवी यांनी 1979 रिलीज झालेल्या पुनाधिरल्लू या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. बापू दिग्दर्शित मन वुरी पांडवुलु हा त्याचा पहिला रिलीज होता. यानंतर 1982 मध्ये आलेला त्यांचा 'इंटलो रामय्या वीडिलो कृष्णय्या' हा सिनेमा हिट ठरला. या चित्रपटानंतर त्यांनी मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Pakistan 3rd ODI 2024 Live Streaming: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना, विजयी संघ मालिका जिंकणार, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचे प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहावे

SL vs SA 1st Test 2024 Preview: श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

SL vs SA 1st Test 2024 Dream11 Team Prediction: दक्षिण आफ्रिका-श्रीलंकामध्ये पहिल्या कसोटीत होणार चुरशीची लढत; सर्वोत्तम फँटसी प्लेइंग इलेव्हन कशी निवडाल? जाणून घ्या

ZIM vs PAK 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून केला पराभव, सॅम अयुबने ठोकले शतक, पाहा सामन्याचे स्कोअरकार्ड