Bal Shivaji: छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास येणार 'बाल शिवाजी' चित्रपटातून शिवभक्तांच्या भेटीस, लवकरच चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याची दिग्दर्शक रवी जाधवांची माहिती

भारतातील तीन प्रसिद्ध स्टुडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी आणि वीर बालपणीच्या अकथित कथांवर आधारित प्रतिष्ठित ऐतिहासिक गाथा तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'बाल शिवाजी' (Bal Shivaji) हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या बारा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतचा जीवनप्रवास सोनेरी पडद्यावर रेखाटणार आहेत.

Bal Shivaji (Pic Credit - Instagram)

भारतातील तीन प्रसिद्ध स्टुडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी आणि वीर बालपणीच्या अकथित कथांवर आधारित प्रतिष्ठित ऐतिहासिक गाथा तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'बाल शिवाजी' (Bal Shivaji) हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या बारा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतचा जीवनप्रवास सोनेरी पडद्यावर रेखाटणार आहेत. हा प्रवास म्हणजे आपल्या स्वराज्याचा पाया रचण्यास त्यांना झालेली मदत होय. दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित हा 'बाल शिवाजी' चित्रपट असणार असून जून 2022 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडित मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजेंड स्टुडिओज प्रस्तुत आणि इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडित, 'रवी जाधव' आणि संदीप सिंग निर्मित सॅम खान, रूपा पंडित सहनिर्मित मराठा आयकॉन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त ड्रीम प्रोजेक्ट 'बाल शिवाजी'ची घोषणा केली.

या चित्रपटाकरिता असोसिएट प्रोड्युसर म्हणून जय पंड्या भूमिका बजावत आहेत. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ते 16 वर्षांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल ज्याने त्यांना स्वराज्याचा पाया रचण्यात मदत केली. बाल शिवाजी चित्रपट तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखनीय प्रवास डोळ्यासमोर उभा करेल, कारण आपल्या शौर्याने देशाला प्रेरणा देणारा हा सर्व काळातील महान राजांपैकी एक आहे. सेल्युलॉइडवर कथन करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आठ वर्षांचे संशोधन लागले, असे दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले. हेही वाचा Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या सेटवर छत्रपती शिवरायांना मानवंदना, कलाकारांनी साजरी केली शिवजंयती

ते म्हणाले की, त्यांना 2015 पासून या विषयावर चित्रपट बनवायचा होता. जाधव यांनी गेल्या वर्षी निर्माता संदीप सिंग यांची भेट घेऊन त्यांना ही कथा सांगितली. ही शौर्यगाथा सांगण्याचे महत्त्व समजून घेतलेल्या संदीपला ही सकारात्मक ऊर्जा मिळाली. भारतावर राज्य केलेल्या महान राजांपैकी एकाचा हा चित्रपट आहे, हा चित्रपट जगभरातील सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

भारताच्या इतिहासाचे भविष्य घडवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या घटनांच्या अनेक कथांवर या दृश्यात्मक चित्रणातून प्रकाश टाकला जाईल. मला ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची आवड आहे. म्हणून रवीने मांडलेला हा विषय माझ्यासाठी कामी आला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट बनवणे हा सन्मान आहे, असे लिजेंड स्टुडिओचे चित्रपट निर्माते संदीप सिंग म्हणतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now