Cartoon Network Shutdown: Warner Bros कडून कार्टून नेटवर्क वेबसाईट बंद; पहा आता कुठे पाहता येणार आवडीचे शोज

नियमित सकाळी 6 पासून ते सुरू होते आणि संध्याकाळी 5 वाजता संपते

Cartoon Network | (Photo Credits: Wikimedia Commons)

Warner Bros कडून Cartoon Network website 26 वर्षांनंतर बंद करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, Warner Bros हे Max या streaming platform वर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यासाठी ते पुन्हा बांधणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी Cartoon Network website बंद केली आहे. Variety च्या रिपोर्ट नुसार  Warner Bros कडून Cartoon Network website 26 वर्षांनंतर बंद करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, Warner Bros हे Max या streaming platform वर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यासाठी ते पुन्हा बांधणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी Cartoon Network website बंद केली आहे. Variety च्या रिपोर्ट नुसार Warner Bros यांनी वेबसाईट बंद करून भविष्यात काही मोठे बदल करून कंटेट मांडला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता subscribers ना Max वर कार्टून नेटवर्कचे सारे शोज आणि अन्य धम्माल गोष्टी पाहता येण्याची शक्यता आहे.

Warner Bros.च्या कार्टून नेटवर्कला बंद करून पैसे वाचवण्यासोबतच चाहत्यांना subscribe करून Max वर त्याचा आनंद लुटण्यासाठी प्रोत्साहित करण्य हा देखील असू शकतो. त्यामुळे आता कार्टून नेटवर्क बंद करून चाहत्यांना पैसे भरून शो चा आनंद घ्यायला लावण्याकडे त्यांचा कल होता.

कार्टून नेटवर्क वेबसाईट बंद झाल्याने आता चाह्त्यांना त्यांचे आवडते कुठे पहायचे असा प्रश्न पडला होता. त्यांनी शो ज मॅक्सच्या माध्यमातून चाहत्यांना पाहण्यासाठी ठेवले आहेत. कार्टून नेटवर्कच्या लायब्ररीसाठी आता स्ट्रीमिंग सेवा हा नवा पर्याय आहे जेणेकरुन त्यांच्या चाहत्यांना त्यांची कार्टून एकाच ठिकाणी सहज ॲक्सेस करता येतील.

Money Control,च्या रिपोर्टनुसार नेटवर्क अजूनही 11 तासांच्या प्रोग्रामचे स्ट्रिमिंग देत आहे. नियमित सकाळी 6 पासून ते सुरू होते आणि संध्याकाळी 5 वाजता संपते. 'सध्या आपण कार्टून नेटवर्क शोज आणि सोशल मीडीया यांच्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. प्रेक्षकांचा सध्या तेथे ओढा असून तेथेच वाढ असल्याचं' कार्टून नेटवर्कच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.