Cannes 2024: 'आई कर्तुत्ववान महिला होती, त्यांचा मुलगा असल्याचा अभिमान'; कान्स चित्रपट महोत्सवात स्मिता पाटील यांच्या मंथन चित्रपटच्या स्क्रीनिंगवर प्रतीक बब्बर याची प्रतिक्रीया
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) तसेच बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरयाची आई यांचा मंथन चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 (Cannes 2024)मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Cannes 2024: दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) तसेच बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बर(Prateik Babbar)याची आई यांचा मंथन चित्रपट कान्स क्लासिक्स विभागांतर्गत कान्स फिल्म फेस्टिव्हल(Cannes 2024)मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्तान टाइम्सला प्रतिक्रीया देताना अभिनेता आणि मुलगा प्रतीक बब्बर याने, 'आईचे काम साजरी होणार आहे. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा एक मोठा क्षण आहे. मी त्यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. हा क्षण मला आई किती कर्तुत्वशील महिला असले याची आठवण करून देतो. तिचा मुलगा म्हणून मी किती भाग्यवान आहे.' (हेही वाचा:Olivia Rodrigo Bra Top Almost Falls: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ब्रा टॉपचे हूक निघाले अन्...; अमेरिकन पॉप स्टार ऑलिव्हिया रॉड्रिगोचा 'तो' व्हिडीओ व्हायरल (Watch Video))
आई स्मिता पाटील यांच्या मंथन चित्रपटाविषयी बोलताना प्रतीक बब्बर पुढे म्हणाला की, "मला याबद्दल नेहमीच माहिती होती. माझी आजी आणि काकू मला चित्रपटाच्या निर्मितीची कथा सांगायच्या. माझे आजोबा देखील शेतकरी होते, त्यामुळे मला नेहमीच माझ्याबद्दल अभिमान वाटत होता. तसेच, मी माझ्या आईचे चित्रपट वारंवार पाहत असतो, माझ्या मित्रांना देखील पाहण्यासाठी सांगतो. चित्रपटात पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण तरीही तुम्ही पाहत राहा असे मी त्यांना सांगत असतो."
77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात या वर्षी आठ भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. ज्यात मंथन चित्रपटाचा समावेश आहे. मंथन 17 मे रोजी कान्स क्लासिक्स निवडी अंतर्गत प्रदर्शित केला जाईल, ज्यामध्ये क्लासिक्स, पुनर्संचयित प्रिंट्स आणि माहितीपट दाखवले जाणार आहेत.
मंथन, भूमिका, आक्रोश, नमक हलाल आणि शक्ती या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पाटील यांनी अभिनेता राज बब्बरशी लग्न केले होते. बाळंतपणातील अडचणीमुळे 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचा मृत्यू झाला.